lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 04-May-24

राशी भविष्य

 कर्क

कर्क

हा महिना आपण काहीतरी करून दाखवायचा आहे. आपणास खूप साऱ्या संधी मिळतील, ज्या आपण योग्य प्रकारे स्वीकारल्यास आपण खूप काही करू शकाल. कामाच्या ठिकाणी आपली स्थिती चांगली असेल. नोकरीत आपले समाधान होईल. आपण आपली कामे इतरांहून उत्तम प्रकारे करू शकाल, व त्यामुळे आपणास सन्मानित दृष्टीने बघितले जाईल. वरिष्ठांचा आपल्यावरील विश्वास सुद्धा वाढेल. व्यापाऱ्यांना आपला अहंकार बाजूस ठेवून इतरांना कमी लेखण्या पासून दूर राहावे लागेल. आपली प्राप्ती उत्तम असेल. काही खर्च झाले तरी आपण तणावमुक्त असाल. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. परंतु आपला जोडीदार जर व्यवसाय किंवा काही काम करत असेल तर हा महिना खूपच चांगला होईल. प्रेमीजनांना ह्या महिन्यात प्रेमिके कडून खास काहीतरी मिळणार आहे. आपणास तिच्या चेहेऱ्या वरील आनंद व भरपूर प्रेम मिळेल, त्यामुळे आपल्यात उत्तम समन्वय साधला जाईल. एकमेकांच्या सहवासात भरपूर वेळ घालविण्याची संधी मिळेल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे. त्यांचे अध्ययन उत्तम होईल. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

03-05-2024 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण दशमी

नक्षत्र : शततारका

अमृत काळ : 07:43 to 09:19

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:30 to 9:18 & 14:54 to 15:42

राहूकाळ : 10:56 to 12:33