lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 06-May-24

राशी भविष्य

 मेष

मेष

ह्या महिन्याची सुरवात आपणास अनुकूल असेल. आपल्यातील सर्जनशीलता वाढल्याने आपण काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. आपल्या प्राप्तीत सुसंगतता राहील. आपण आपले खर्च भागविण्यात यशस्वी व्हाल. आपण आपल्या एखाद्या छंदास प्राप्तीचे साधन बनवू शकता. आपले व्यक्तिगत व व्यावसायिक जीवन सुरळीत चालण्यासाठी आपणास आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून आपण अनेक समस्यां पासून आपला बचाव करू शकता. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असल्याचे जाणवेल. आपला अहंकार आडवा आल्याने आपसातील संबंध बिघडू शकतात. अशा वेळी आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराशी प्रेमाने बोलावयास हवे. एकमेकांशी बोलूनच समस्यांचे निराकरण करावे लागेल. प्रेमीजनांना एकमेकांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. त्यांच्यात उत्तम समन्वय साधला जाईल. आपल्या प्रेमिकेशी जोडले गेल्याची त्यांची भावना तीव्र होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली कामगिरी करून दाखविण्याची संधी मिळेल. कार्यालयात आपली स्थिती चांगली असेल. आपण जर एखादा व्यापार करत असाल तर कायदेशीर समस्यां पासून दूर राहून आपली कामे उत्तम प्रकारे पूर्णत्वास न्या. आपण आपल्या मधुर वाणीने लोकांना आकर्षित करून आपली कामे करवून घ्याल. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी.

राशी भविष्य

06-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण त्रयोदशी

नक्षत्र : रेवती

अमृत काळ : 14:09 to 15:46

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:29 to 13:17 & 14:53 to 15:41

राहूकाळ : 07:42 to 09:19