बच्चू कडूंच्या अचलपूर मतदारसंघात भाजपची मतविभाजनाची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 04:07 AM2019-09-06T04:07:39+5:302019-09-06T04:07:52+5:30

या घडामोडींमुळे सतर्क झालेल्या भाजपक्षाने यावेळी बच्चू कडू नावाचा 'अडसर' विधानसभेत पोहोचूच द्यावयाचा नाही

BJP's strategy of split in Achalpur constituency of Bachu Kadu | बच्चू कडूंच्या अचलपूर मतदारसंघात भाजपची मतविभाजनाची रणनीती

बच्चू कडूंच्या अचलपूर मतदारसंघात भाजपची मतविभाजनाची रणनीती

googlenewsNext

गणेश देशमुख

अमरावती : अचलपूर मतदारसंघात चळवळतील नेते अशी प्रतिमा असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी निवडून येण्याची हॅट्ट्रिक केली असली तरी कडू यांच्या विरोधात भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे.बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेची स्थापना करून राज्यभरात त्याचा विस्तार केला. त्यांच्या अपक्ष असण्यामुळेच केंद्र शासनावर कधी त्यांनी यात्रेतून 'आसूड' ओढण्याचा प्रयत्न केला, तर कधी आक्रमक आंदोलनांतून राज्य शासनाला कोंडीत पकडले. तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना 'साले' संबोधल्याच्या मुद्यावरून बच्चू कडू यांनीच लोकसभा निवडणुकीदरम्यान थेट दानवेंच्या मतदारसंघातील राजकारण तापविले.

या घडामोडींमुळे सतर्क झालेल्या भाजपक्षाने यावेळी बच्चू कडू नावाचा 'अडसर' विधानसभेत पोहोचूच द्यावयाचा नाही, अशी रणनीती आखल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यादृष्टीने आखण्यात आलेल्या दृश्य-अदृश्य अनेक योजनांपैकी अचलपूर मतदारसंघात प्राबल्य असलेल्या माळी समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय जवळ-जवळ झाला आहे. या रणनीतीतून एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील - बच्चू कडू यांचा दबदबा बसेल आणि माळी समाजाला नेतृत्वाची संधी दिली जाईल. दुसरीकडे भाजपला मात देण्यासाठी बच्चू कडूही तयारीत आहेत. विकासकार्याचे आक्रमक मार्केटिंग ते करतील, शिवाय गनिमी कावा हे बच्चू यांचे जुने हत्यार सोबतीला आहेच.
रिपाइंचे राजेंद्र गवई हे अचलपुरातून मित्रपक्ष काँग्रेसच्या कोट्यातून तिकीट मागत आहेत. काँग्रेसने विधान परिषदेचे आश्वासन दिले; पण गवई मानण्यास तयार नाहीत. अखेरीस रिपाइंच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा त्यांचा मनसुबा आहे. याच मतदारसंघातून राष्टÑवादीच्या सुरेखा ठाकरे यादेखील उत्सूक आहेत. आघाडीत हा मतदारसंघ कोणाला सुटतो, यावर बरेच काही अवलंबून आहे.

पाच वर्षांत काय घडले?
च्५० वर्षांत तीन धरणे होती. बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून सहा धरणे झाली.
च्पूर्वी दोन मोठी रुग्णालये आणि चार प्राथमिक आरोग्य केंदे्र होती. बच्चू कडू यांच्या काळात चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक सामान्य रुग्णालय, एक स्त्री रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, एक ग्रामीण रुग्णालय यांची निर्मिती झाली.
च्पूर्वी अडीच हजार लोकांना श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेतून मानधन मिळायचे. कडू यांनी आंदोलन केल्यानंतर ती संख्या ३५ हजार इतकी वाढविली.
च्६५ हजार रुग्णांची रुग्णसेवा बच्चू यांच्या ‘प्रहार’ ने केली. ३५ हजार जातीचे दाखले शाळांतून वाटले.
च्शेतकरी, अपंग आणि अंगणवाडी सेविकांसाठी कडू यांनी वेळोवेळी आंदोलनं केली आहे.

निवडणूक २०१४
बच्चू कडू (अपक्ष)
५९,२३४ मते
अशोक बनसोड (भाजप)
४९,०६४ मते
बबलू देशमुख (काँग्रेस)
३१,४७५ मते

संभाव्य प्रतिस्पर्धी
बबलू देशमुख (काँग्रेस)
नंदू वासनकर (भाजप/सेना)
सुरेखा ठाकरे (राष्ट्रवादी)
राजेंद्र गवई (रिपाइं)

दोन एमआडीसी, फिनले मिल, १८८ गावांत शुद्ध पाणी, आधुनिक तहसील कार्यालय यांची निर्मिती केली. संत्रा प्रोसेसिंग युनिट, दुग्धसंकलन केंद्र मंजूर झाले. मजुरांचा विमा काढणारा देशातील पहिला आणि एकमेव मतदारसंघ ठरला. पुन्हा संधी मिळाली, तर उभ्या केलेल्या इमारतीला नीट छपाई आणि रंगरंगोटी करता येईल.
- बच्चू कडू, आमदार अचलपूर

Web Title: BJP's strategy of split in Achalpur constituency of Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.