त्याने किस घेताना फोटो काढले, ‘डिलिट’साठी २० हजार मागितले !

By प्रदीप भाकरे | Published: April 20, 2024 06:13 PM2024-04-20T18:13:32+5:302024-04-20T18:14:46+5:30

फेसबुक फ्रेंडकडून लैंगिक शोषण : ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी

A case has been registered against a youth in the case of sexual harassment of a girl in Amravati | त्याने किस घेताना फोटो काढले, ‘डिलिट’साठी २० हजार मागितले !

त्याने किस घेताना फोटो काढले, ‘डिलिट’साठी २० हजार मागितले !

अमरावती : ‘त्या’ दोघांची फेसबुकवर ओळख झाली. त्याने पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट तिने स्वीकारली. अन् तिथेच ती फसली. त्याने गोड बोलून तिचे लैंगिक शोषण केले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिचे चुंबन घेताना काढलेला फोटो डिलिट करण्यासाठी चक्क २० हजार रुपये मागितले. तो त्रास असह्य झाल्याने अखेर तिने १९ एप्रिल रोजी खोलापुरी गेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी शुक्रवारी दुपारी आरोपी राहुल संजय बुंदले (रा. अकोला) याच्याविरुद्ध बलात्कार, खंडणी, धमकी व आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, यातील फिर्यादी तरुणीला सन-२०२३ मध्ये आरोपीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर ते दोघे एकमेकांसोबत फोनवर बोलत होते. काही दिवसांनी त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ते सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागले. दरम्यान, आरोपी राहुल हा अमरावती येथे भाड्याने राहण्यासाठी आला. ऑक्टोबर-२०२३ मध्ये घरी कोणी नसताना आरोपीने फिर्यादी मुलीशी शरीरसंबंध केले. त्यानंतर आरोपीने दुसऱ्या ठिकाणी भाड्याने खोली घेतली. तेथे यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला देखील त्याने तिचे शोषण केले. त्यादरम्यान आरोपीने तिचे चुंबन घेतानाचे फोटो सुध्दा काढले. काही दिवसांनी ते फोटो डिलिट करण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली.

धमकीने ती हादरली

पैसे न दिल्यास ते फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे ती नखशिखांत हादरली. तो प्रकार तिने कुटुंबीयांच्या कानावर घातला. अखेर तिने शुक्रवारी दुपारी खोेलापुरी गेट पोलिस ठाणे गाठले. ठाणेदार स्वाती पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत महिला पोलिसांकडून पीडिताचे जबाब नोंदवून घेतले. तथा गुन्ह्याची नोंद केली.

Web Title: A case has been registered against a youth in the case of sexual harassment of a girl in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.