अकोला जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 06:53 PM2019-09-30T18:53:53+5:302019-09-30T18:54:02+5:30
अरुण शेषराव काठोळे रा.गांधीग्राम व नामदेवराव तुळशीराम धर्माळे रा.बांबर्डा असे मृतक शेतकºयांची नावे आहे.
गांधीग्राम/ रोहणखेड : सतची नापीकी व वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून गांधीग्राम व बांबर्डा येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अरुण शेषराव काठोळे रा.गांधीग्राम व नामदेवराव तुळशीराम धर्माळे रा.बांबर्डा असे मृतक शेतकºयांची नावे आहे.
गांधीग्राम येथील अरुण शेषराव काठोळे (५०) हे रविवारी आपल्या शेतात गेले होते. तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे शेजारी असलेल्या शेतकºयांच्या लक्षात आले. शेतकºयांनी त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री ११:३० दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. सोमवारी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण काठोळे यांच्यावर पंधरा ते वीस हजार रुपये बँकेचे कर्ज आहे. तसेच पन्नास हजार रुपयांचे मुद्रा लोण आहे. तर नातलगांजवळून काही उसनवारी घेतलेली होती.गेल्या दोन वर्षांपासून त्यांना पीक झाले नाही. यंदाही भरपुर पाऊस झाल्यामुळे त्यांची कपाशी पिवळी पडली आहे. तसेच मूगाच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते अस्वस्थ राहत होते. त्यातच त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांचे जवळ पाऊण एकर (३० गुंठे) शेत आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.
रोहणखेड येथून जवळच असलेल्या बांबर्डा येथील नामदेवराव तुळशीराम धर्माळे (७५)यांनी २८ सप्टेंबर रोजी सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून शेततळ््यात उडी घेउन आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एक शेती आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून शेतात अल्प उत्पादन होत होते. शेती मशागतीसाठी त्यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.यावर्षी संततार पावसामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. २८ सप्टेंबर रोजी घरी कुणालाही न सांगता ते शेतात गेले होते. शेतातील शेततळ््यात उडी घेउन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी व आप्त परिवार आहे.