शेत शिवारफेरी: हजारो शेतकऱ्यांनी जाणून घतले नवतंत्रज्ञान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 02:26 PM2019-11-05T14:26:35+5:302019-11-05T14:34:31+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शेतकºयांसाठी ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत शिवारफेरीचे आयोजन केले.
अकोला : नवे संशोधन, कृषी तंत्रज्ञानाचा शेतावर अवलंब करू न कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे, यासाठीची परिपूर्ण माहिती देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शेतकºयांसाठी ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत शिवारफेरीचे आयोजन केले असून, मंगळवार,५ नोव्हेंबर रोजी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या प्रमुख उपस्थित शेतकरी वासुदेव नामदेव राऊत व दुर्गा शामसुंदर टावरी यांच्याहस्ते शिवारफेरीचा प्रारंभ सकाळी ९.३० वाजता शेतकरी सदन येथून करण्यात आला. पहिल्याच दिवशी विदर्भातील हजारो शेतकºयांनी नवे कृषी संशोधन,तंत्रज्ञान जाणून घेतले.
विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे आयोजित तीन दिवसीय शिवारफेरीत प्रत्यक्ष शेतशिवार बघण्याचा कार्यक्रम असून, दुपारी ४ ते ५ वाजतापर्यंत डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात र्चासत्र घेण्यात आले आहे. तीन दिवस चालणाºया या चर्चासत्रात शेतकºयांच्या शेती, संशोधन व तंत्रज्ञानासंदर्भातील शंकांचे निरसन केले जाणार आहे. याप्रसंगी डॉ.भाले यांनी उद्यान विद्या, कृषी विद्या, कापूस संशोधन, फळ संशोधन,ज्वारी संशोधन केंद्राची पाहणी करू न शेतकºयांना मार्गदर्शन केले. त्यांनी पारपांरिक शेतीसोबतच मिश्र शेती करणे गरजेचे असून, शाश्वत शेती,शेतकºयांचे आत्मबळ वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या विविध संशोधन,विविध बियाणे,तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.कृषी विद्यापीठ शेतकºयांच्या सेवेत तत्पर असल्याचेही डॉ.भाले म्हणाले. शेतकºयांनी शेतीसोबतच जोडधंदा करावा, दुग्ध व्यवसाय,फळ, फु ले, भाजीपाला आदीबाबत शेतकºयांनी पुढे यावे,कृषी विद्यापीठ त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचा विश्वास त्यांनी शेतकºयांना दिला. यावेळी संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर,संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे,आधिष्ठाता अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे,निम्न शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे,अधिष्ठाता पदव्यूत्तर डॉ.ययाती तायडे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडून आदीसह सर्वच शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.
यावर्षी शेतकºयांना सेंद्रिय शेतीसंदर्भात माहितीवर भर देण्यात आला.तसेच उद्यान विद्या, कापूस संशोधन केंद्र, संशोधन प्रकल्प (फळे), ज्वारी संशोधन, कोरडवाहू शेती संशोधन, कडधान्य, तेलबिया संशोधन केंद्र, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय येथे अवजारे प्रदर्शन, नागार्जुन वनौषधी उद्यान व दुग्धशास्त्र विभाग येथील देशी गायी प्रकल्पांना शेतकºयांनी भेटी देऊन माहिती जाणून घेतली. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र भेटी देऊन डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवनचरित्रही शेतकºयांनी जाणून घेतले.उद्यान विद्या विभागात डॉ.शशांक भराड,कृषी विद्यामध्ये डॉ. आदीनाथ पासलावार,कापूस संशोधन विभाग डॉ.डी.टी.देशमुख,फळ संशोधक डॉ.दिनेश पैठणकर,ज्वारी संशोधन विभाग डॉ. आर.बी.घोराडे यांनी महिती दिली.डॉ. किशोर बिडवे यांनी संचालन केले.