कुख्यात गुंड ‘लाल्या’ला ‘एमपीडीए’चा दणका; कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर हात उचलणे भाेवले

By आशीष गावंडे | Published: April 18, 2024 09:33 PM2024-04-18T21:33:20+5:302024-04-18T21:33:39+5:30

त्याच्याविराेधात यापुर्वीही विविध कलमान्वये प्रतिबंधक तसेच ‘एमपीडीए’ अन्वये कारवाइ आली होती. परंतु ताे पाेलिसांच्या कारवाइला जुमानत नव्हता.

Notorious gangster 'Lalya' slapped by 'MPDA'; A senior prison officer was forced to raise his hand | कुख्यात गुंड ‘लाल्या’ला ‘एमपीडीए’चा दणका; कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर हात उचलणे भाेवले

कुख्यात गुंड ‘लाल्या’ला ‘एमपीडीए’चा दणका; कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर हात उचलणे भाेवले

अकोला: जिल्हा कारागृहात एक वर्षांसाठी स्थानबध्द केलेल्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेलेला कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ लाल्या अशाेक पालकर (३४) रा. पंचशिल नगर वाशिम बायपास याने कारागृहातील तुरुंग अधिक्षकावर हात उचलल्याची गंभीर दखल घेत जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘लाल्या’ला ‘एमपीडीए’चा दणका दिला आहे. गुरुवारी ‘लाल्या’ला एक वर्षांसाठी वाशिम येथील कारागृहात खडी फाेडण्यासाठी पाठविण्याची कारवाइ करण्यात आली. या कारवाइमुळे स्वत:ला दादा,भाइ म्हणविणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

वाशिम बायपास परिसरातील पंचशिल नगरमध्ये राहणाऱ्या कुख्यात गुंड स्वप्नील उर्फ लाल्या अशोक पालकर याच्यावर यापुर्वी खूनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी करणे, गंभीर दुखापत करणे, एखा‌द्या व्यक्तीला मृत्युची भिती दाखवणे, धमक्या देऊन घरावर अतिक्रमण करणे, घातक हत्यार किंवा साधनांचा वापर करणे, प्राण घातक हत्यारानिशी सज्ज होवुन दंगा करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविराेधात यापुर्वीही विविध कलमान्वये प्रतिबंधक तसेच ‘एमपीडीए’ अन्वये कारवाइ आली होती. परंतु ताे पाेलिसांच्या कारवाइला जुमानत नव्हता.

अखेर पाेलिस अधीक्षक सिंह यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, ‘पीएसआय’ आशिष शिंदे, ज्ञानेश्वर सैरिसे, उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, सिटी कोतवालीचे ठाणेदार सुनिल वायदंडे, ‘पीएसआय’माजीद पठाण,अंमलदार दिनेश शिरसाठ यांनी कुख्यात गुंड स्वप्नील पालकरची कुंडली जमा करीत ‘एमपीडीए’चा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी दिली. 

जिल्हा पाेलिस अधिक्षकांची करडी नजर
कुख्यात गुंड लाल्या उर्फ स्वप्नील पालकर हा अकाेला कारागृहात बंदिस्त असलेल्या एका कुख्यात गुंडाला भेटण्यासाठी कारागृह परिसरात गेला हाेता. यावेळी त्याने तुरुंग अधिक्षकांसाेबत वाद घालून धक्काबुक्की केली होती. या प्रकाराची जिल्हा पाेलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी गंभीर दखल घेतल्याचे या कारवाइवरुन समाेर आले आहे. ही कारवाइ गावगुंडांसाठी धाेक्याचा इशारा मानला जात आहे.

Web Title: Notorious gangster 'Lalya' slapped by 'MPDA'; A senior prison officer was forced to raise his hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.