Maharashtra Assembly Election 2019: मतदान पथके रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:01 PM2019-10-20T13:01:13+5:302019-10-20T13:01:54+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या १९४ बसेस, ९४ मिनी बसेस व १८३ जीप गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान पथके २० आॅक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मुख्यालयावरून नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाली आहेत. मतदान पथकांच्या परिवहन व्यवस्थेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १९४ बसेस, ९४ मिनी बसेस व १८३ जीप गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान पथकांच्या वाहनांवर ‘जीपीएस’वापर करण्यात आला आहे.
उद्या १७०३ केंद्रावर मतदान होणार आहे. रविवारी जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर इव्हीएम तसेच व्हीवीपॅट मशीन रवाना करण्यात आल्या. यावेळी पोलीस विभाग, होमगार्ड, सीआरपीएफ तसेच बाहेरील राज्यातून आलेले पोलिस यांच्या कडेकोट बंदोबस्तात पथके रवाना करण्यात आली.