गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरण: अखेर पाच पोलिस कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली, पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचारी कारागृहात

By नितिन गव्हाळे | Published: May 13, 2024 12:38 AM2024-05-13T00:38:19+5:302024-05-13T00:39:14+5:30

अकोट पोलीस स्टेशन अंतर्गत मोबाईल चोरीच्या प्रकरणात गोवर्धन हरमकार याला ताब्यात घेतल्यानंतर या युवकाला पोलिसांनी मारहाण केल्याने, त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांनी केला आहे. 

Govardhan Haramkar death case: Finally five police personnel transferred to headquarters, staff including sub-inspector of police in jail | गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरण: अखेर पाच पोलिस कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली, पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचारी कारागृहात

प्रतिकात्मक फोटो...

जिल्ह्यातील अकोट पोलीस स्टेशनमध्ये गोवर्धन हरमकार या संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात अखेर पाच पोलिसांनापोलिस मुख्यालयात अटॅच करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शनिवार ११ मे रोजी अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार तपन कोल्हे यांचीही बदली मुख्यालयात करण्यात आली आहे. अकोट पोलीस स्टेशन अंतर्गत मोबाईल चोरीच्या प्रकरणात गोवर्धन हरमकार याला ताब्यात घेतल्यानंतर या युवकाला पोलिसांनी मारहाण केल्याने, त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांनी केला आहे. 

मृतकांच्या कुटूंबियांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आतापर्यंत पीएसआय राजेश जवरे आणि पोलिस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंके अकोट पोलीस ठाण्यातील मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पचांगे आणि रवि सदाशिव यांच्याविरूद्ध खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या पोलिस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी सोळुंके न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यापासून उर्वरित पोलिस कर्मचारी बेपत्ता आहेत.

नेमके काय आहे, प्रकरण?
मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकर यांच्या तक्रारीनुसार एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी पुतण्या गोवर्धन याला अटक केली. त्यानंतर १६ जानेवारीला सुकळी गावात आणत घराची झडती घेतली. पुढे पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतले. १६ जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी दोघांनाही अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या मारहाणीत सुखदेव हरमकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने दोघांनी रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला बाहेरील आकाश नामक व्यक्तीच्या मदतीने पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केले आणि १७ जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
 

Web Title: Govardhan Haramkar death case: Finally five police personnel transferred to headquarters, staff including sub-inspector of police in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.