अकोट निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 07:58 PM2019-10-24T19:58:55+5:302019-10-24T19:59:47+5:30

Akot Vidhan Sabha Election Results 2019: भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळवत वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.संतोष रहाटे यांचा पराभव केला.

Akot Election Results 2019:Maharashtra vidhan sabha election Results 2019 : Prakash Bharsakale win | अकोट निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी

अकोट निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी

Next

- विजय शिंदे

अकोट: अकोट मतदार संघ हा निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान १२ मतदान यंत्रावर विविध कारणाने आक्षेप झाले होते. त्या मतदान यंत्रामधील मतमोजणी करीता भाजपा उमेदवार प्रकाश भारसाकळे व वंचित आघडीचे अ‍ॅड संतोष रहाटे यांच्यात झुंज दिसुन आली. या मतदान यंत्रामधील मतमोजणी होई पर्यंत या दोन्ही उमेदवार व त्यांचे कार्यकतार्चा जीव टांगणीला लागला होतो. दरम्यान रात्री सर्व आक्षेप दुर करीत त्या बारामशीन मधील मतमोजणी घेण्यात आली. मतदान केंद्र १९७ वरील मशीन बिघाड असल्याने व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतमोजणी झालेल्या चिठ्या काढुन मग मोजणी करून घेण्यात आली.अखेर भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळवत वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.संतोष रहाटे यांचा पराभव केला.
अकोट मतदार मतदारसंघात मतमोजणी सुरू असतांना काही मतदानयंत्र सुरू होत नव्हती. तर मतदार यंत्राला वेगवेगळे सिल लागले होते.त्यामुळे मतदान केंद्र १२७,१४१,१९७,१९१, २४७,१७८,३१८ २५२ वरील एकुण १२ मतदान यंत्राची मत मोजणी थांबवली होती, तर मतदान केंद्र १९७वरील मशीन वर आक्षेप नोंदवला होता.त्यामुळे या मतदान यंत्राची मतमोजणी बाजुला ठेवण्यात आली होती. पंरतु दुसरीकडे भारसाकळे व रहाटे यांच्यात २४ व्या फेरी अखेर ७ हजार २९६ मतांचा फरक होता. तर दुसरीकडे त्या बारा मशीन मधील मतमोजणी बाकी होती. मताची आघाडी असल्याने मतमोजणी केंद्राकडे येण्यास निघालेले भाजपाचे प्रकाश भारसाकळे हे मध्येच थांबले तर ही माहीती वंचीत आघाडीचे अ‍ॅड संतोष रहाटे हे मतमोजणी केंद्रात पोहचले होते.त्यामुळे या मतमोजणी कडे उमेदवार, कार्यकर्ते व नागरीकाचे लक्ष लागले होते. शेवटची २४ वी फेरी जाहीर झाल्यानंतर आक्षेप व बंद पडलेल्या मशीन यंत्र प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आक्षेपकर्ता यांचे समाधान केले. तर आक्षेपवर असलेला निर्णय लेखी स्वरूपात अँड. रहाटे यांनी घेतला. तर बंद पडलेली मतदान यंत्र भारत निवडणूक आयोगाचे नियमानुसार मतमोजणी घेतली. तर मतदान केंद्र १९७ वरील मशीन बिघाड असल्याने व्हीव्ही पँड माध्यमातून मतमोजणीची प्रक्रीया राबविण्यात आली. अखेर या १२ मशीन यंत्राची मतमोजणी झाल्यानंतरही भाजपाचे उमेदवार प्रकाश भारसाकळे हे आघाडी चे मते घेत विजयी ठरले.

Web Title: Akot Election Results 2019:Maharashtra vidhan sabha election Results 2019 : Prakash Bharsakale win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.