Akola: गैरव्यवहार, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषीनिविष्ठा केंद्रांवर कृषी विभागाचे पथक

By रवी दामोदर | Published: May 16, 2024 05:46 PM2024-05-16T17:46:11+5:302024-05-16T17:46:20+5:30

Akola News: बियाणे व इतर निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता, गैरव्यवहार घडू नये यासाठी कृषी सेवा केंद्रांच्या ठिकाणी नियमित पडताळणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Akola: Agriculture Department teams up at Agri Investment Centers to prevent malpractices, cheating farmers | Akola: गैरव्यवहार, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषीनिविष्ठा केंद्रांवर कृषी विभागाचे पथक

Akola: गैरव्यवहार, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषीनिविष्ठा केंद्रांवर कृषी विभागाचे पथक

- रवी दामोदर 

अकोला : बियाणे व इतर निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता, गैरव्यवहार घडू नये यासाठी कृषी सेवा केंद्रांच्या ठिकाणी नियमित पडताळणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

छापील विक्री किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, विशिष्ट वाणांच्या बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणे किंवा एका वाणासोबत इतर वाणाचे बियाणे किंवा निविष्ठा खरेदी करण्यास भाग पाडणे या बाबी कदापिही घडता कामा नये, अशा स्पष्ट सूचना पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांनी दिल्या आहेत. अधिकृत बी. टी. कापूस बियाणे वाणाचे वितरण व विक्री ही परवानाप्राप्त अधिकृत विक्री केंद्राद्वारे व बियाणे वेष्टनावरील छापील किमतीच्या मर्यादेतच होणे अनिवार्य आहे.

निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार घडू नये म्हणून कृषी सेवा केंद्रांवर कर्मचा-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांनी केंद्रावरील प्राप्त साठा व विक्री होत असलेला साठा नियमितपणे तपासण्याचे व गैरप्रकार आढळल्यास तत्काळ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Akola: Agriculture Department teams up at Agri Investment Centers to prevent malpractices, cheating farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला