गावठी दारू बनविण्याचा अड्डा उद्ध्वस्त; दोघांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 03:12 PM2020-04-29T15:12:32+5:302020-04-29T15:13:05+5:30
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालुक्यातील कासारा दुमाला परिसरातील प्रवरा नदीपात्रालगत असलेला गावठी दारू बनविण्याचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला.
संगमनेर : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालुक्यातील कासारा दुमाला परिसरातील प्रवरा नदीपात्रालगत असलेला गावठी दारू बनविण्याचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. ही कारवाई मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाले आहेत.
सागर उर्फ टायगर बर्डे, अरूण बर्डे (दोघेही रा. कासारा दुमाला, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांना कासारा दुमाला शिवारातील प्रवरा नदीपात्रातलगत गावठी दारू बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस हेड कॉँस्टेबल, वाहन चालक सुरेश गोलवड, पोलीस कॉँस्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, साईनाथ तळेकर यांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे रसायन व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. पळून गेलेल्या दोघांची नावे चौकशी दरम्यान समोर आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संदीप बोटे तपास करीत आहेत.