नगरमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा

By अण्णा नवथर | Published: May 13, 2024 08:41 AM2024-05-13T08:41:15+5:302024-05-13T08:41:52+5:30

अण्णा नवथर , अहमदनगर लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नगर शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी  सकाळी आठ ...

Line up at polling booths in the city since morning | नगरमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा

नगरमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा

अण्णा नवथर ,अहमदनगर

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: नगर शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी  सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. मतदार स्वतःहून मतदान स येऊन मतदान करत आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदार संघामध्ये आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे नगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये असलेल्या मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदारांनी हजेरी लावत मतदान केले. नगर शहरातील मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सावेडी शहरातील मतदान केंद्रांवर महिलांसह पुरुष यांची रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. नगर शहरातील नगरसेवक तसेच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या बाहेर उपस्थित आहेत सकाळच्या सत्रात मतदान करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत दुपारनंतर ऊन होईल, या भीतीने अनेकजण सकाळीच मतदान करत आहेत.

Web Title: Line up at polling booths in the city since morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.