कार अपघातात दोन ठार 1 जखमी, जोडमोहा जवळची घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 04:36 PM2020-11-08T16:36:31+5:302020-11-08T16:37:40+5:30

मृत वाघापूर व वंजारी फैलातील रहिवाशी

Two killed, one injured in car accident in yavatmaal | कार अपघातात दोन ठार 1 जखमी, जोडमोहा जवळची घटना 

कार अपघातात दोन ठार 1 जखमी, जोडमोहा जवळची घटना 

googlenewsNext
ठळक मुद्देएम.एच.२९/एबी-१५९८ या क्रमांकाच्या इंडिका कारने हे तिघे पांढरकवडा येथून यवतमाळसाठी निघाले होते. खटेश्वर गावाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार निंबाच्या झाडावर आदळली

जोडमोहा (यवतमाळ) : कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन ठार, तर एक जण जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पांढरकवडा रोडवरील खटेश्वर वळणावर घडली. या घटनेतील मृतांमध्ये प्रशांत दिगांबर मंडगवार (४५) रा.वाघापूर टेकडी यवतमाळ आणि नितीन गोविंद लांगर (३७) रा.वंजारीफैल यवतमाळ यांचा समावेश आहे. बहादुरे हे जखमी आहे. ते कार चालवत होते. 

एम.एच.२९/एबी-१५९८ या क्रमांकाच्या इंडिका कारने हे तिघे पांढरकवडा येथून यवतमाळसाठी निघाले होते. खटेश्वर गावाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार निंबाच्या झाडावर आदळली. यात दोघे ठार झाले. जखमीला तात्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.  या घटनेची माहिती जोडमोहाच्या पोलीस पाटील सूमन राजुरकर यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार करेवाड, जोडमोहा बीटाचे जमादार गदई, संजय राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अपघातातील दोघांचे मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले.
 

Web Title: Two killed, one injured in car accident in yavatmaal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.