कोरोनाच्या धास्तीने महाराष्ट्रात वनपर्यटन रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 01:07 PM2020-03-17T13:07:59+5:302020-03-17T13:09:57+5:30

राज्यात कोव्हीड-१९ या व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत विविध क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे.

The threat of Corona; Forest tourism in Maharashtra stopped | कोरोनाच्या धास्तीने महाराष्ट्रात वनपर्यटन रोखले

कोरोनाच्या धास्तीने महाराष्ट्रात वनपर्यटन रोखले

Next
ठळक मुद्देप्रधान मुख्य वनसंरक्षकाचे आदेश राज्यभरातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये ३१ मार्चपर्यंत बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाला असून दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील वनपर्यटनावरही आता प्रतिबंध लावण्यात आला आहे. राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमध्ये ३१ मार्चपर्यंत पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
या संदर्भात सोमवारी मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी तातडीने परिपत्रक जारी केले आहे. राज्यात कोव्हीड-१९ या व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत विविध क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. त्या अनुषंगाने आता व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यातील पर्यटनालाही ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
राज्यातील काही व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमध्ये देशभरातून तसेच विदेशातील पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ मार्च ते ३१ मार्चपर्यंत ही स्थळे पर्यटनासाठी बंद राहतील असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. अभयारण्यांसोबतच एरोली (नवी मुंबई) येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र व त्यातील ठाणे क्रीक फ्लेमिंगो सफारी ही ठिकाणेही बंद राहणार आहे.

Web Title: The threat of Corona; Forest tourism in Maharashtra stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.