Telecom Department's poll expires | दूरसंचार विभागाचे पोल कालबाह्य
दूरसंचार विभागाचे पोल कालबाह्य

ठळक मुद्देमालमत्ता इतरांच्या वापरात : शहरासह ग्रामीण भागातील यंत्रणा वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दूरसंचार क्षेत्रा देशपातळीवर पूर्वीपासून कार्यरत असलेल्या बीएसएनएलची मोठी गुंतवणूक आहे. जेव्हा आॅप्टीक फायबर केबलचा शोध नव्हता. त्या काळात लोखंडी पोल व तारांच्या माध्यमातून फोनची जोडणी देण्यात येत होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी टेलिफोन फोन दिसत होते. ग्रामीण नेटवर्क पोहोचविण्यासाठी याचाच वापर केला जात होता. बदल्या तंत्रज्ञानाने ही संपूर्ण यंत्रणा आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे बीएसएनएलची मालमत्ता सर्वत्र विखुरली आहे. अनेक ठिकाणेच पोल, तार गायब झाल्या आहेत. तर शहरामध्ये टलिफोन पोलचा वापर हा केबलवाले करत आहेत. यातून बीएसएनएलला कोणतेच भाडे मिळत नाही.
माहिती तंत्रज्ञामध्ये सातत्याने आमूलाग्र बदल होत आहे. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. सुरूवातील लॅन्ड लाईन फोनचा वापर हा आॅपरेटरच्या माध्यमातून करावा लागत होता. याला ट्रंक कॉल देखील संबोधले जात होते. त्यानंतर घरच्या लॅन्ड लाईन फोनवरून थेट कॉल मिळत होता. पूर्वी फोन हा काही ठराविक घरातच दिसत असे, त्यानंतर बीएसएनएलने गावागावात नेटवर्क पोहोचविण्यासाठी आॅप्टीक फायबर केबल टाकणे सुरू केले. या काळात मोबाईल महानगरापूरताच मर्यादित होता. दरम्यान नेटवर्क कव्हरेज वाढविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू होते. सरकारच्या अधिपत्याखालील कंपनीने आपल्या विस्तारावर लक्ष केंद्रीत केले. मोबाईल येताच टॉवर उभारणी केली. या सर्व बदलत्या तंत्रज्ञानाने टेलिफोन पोल व तारा दुर्लक्षित झाल्या. या पोल व तारा गोळा करण्यासाठी येणारा खर्च हा त्याच्या आजच्या बाजार भावापेक्षा अधिक असल्याचे दूरसंचार विभागातील एका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय जुन्या मालमत्तेबाबतचा निर्णय हा दिल्ली व मुंबई येथील कार्यालयात घेतला जातो. त्यामुळे यावर अजूनपर्यंत तरी कोणतेच धोरण ठरलेले नसल्याचे सांगण्यात आले. कधीकाळी गल्लीबोळात लागलेले टेलिफोन पोल आता इतरांकडून वापरले जात आहे. वाहिन्यांच्या केबल चालकांनी याचा पुरेपूर उपयोग केला आहे. तर काही ठिकाणचे पोल हे अनेकांनी इतरत्र काढून लावले आहेत.


Web Title: Telecom Department's poll expires
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.