शिक्षण व शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 09:41 PM2019-08-21T21:41:31+5:302019-08-21T21:43:45+5:30

शिक्षण व शिक्षकांच्या आश्वासित आणि मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनतर्फे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना निवेदन देण्यात आले.

Statement of education and teacher questions | शिक्षण व शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन

शिक्षण व शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिक्षणशिक्षकांच्या आश्वासित आणि मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनतर्फे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना निवेदन देण्यात आले.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असूनही अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतरांना जुनी पेन्शन योजना लागू केली नसल्याने त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक व शिक्षकेतरांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, घोषित व अघोषित उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना त्वरित अनुदान लागू करावे, माध्यमिक शाळांना प्रचलित अनुदान सूत्र लागू करण्यात यावे, शासनाच्या धोरणामुळे प्रभावित झालेल्या दहावीच्या निकालाचा विपरित परिणाम अकरावी विद्यार्थी प्रवेश संख्येवर झाला. त्यामुळे सत्र २०१८-१९ ची संच मान्यता स्थगित करावी, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे १०.२० व ३० वर्षांच्या सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी, यासह महासंघ आणि विज्युक्टाच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करावी आदी बाबी शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
निवेदन सादर करताना प्रांत उपाध्यक्ष प्रा. दत्तात्रय जयपुरकर, जिल्हाध्यक्ष प्रा. रंगराव लांजेवार, जिल्हा सचिव प्रा. रमेश जोल्हे, प्रा. भालचंद्र केंढे, प्रा. मनोहरराव जुनघरे, प्रा. अनंत पांडे, प्रा. विनायकराव कराळे, प्रा. अजय चिंचोळकर, प्रा. आनंद मेहरे, प्रा. विशाल क्षीरसागर, प्रा. आडे यांच्यासह विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Web Title: Statement of education and teacher questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.