दारव्हा येथे संजय राठोड यांचा नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:09+5:30

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

Sanjay Rathod's civil hospitality in Darwah | दारव्हा येथे संजय राठोड यांचा नागरी सत्कार

दारव्हा येथे संजय राठोड यांचा नागरी सत्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सामाजिक संघटना व नागरिकांतर्फे शनिवारी येथील एका मंगल कार्यालयात नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर आयोजक तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, धार्मिक संस्थान व नागरिकांतर्फे ना. राठोड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांची लाडू तुला करण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना ना.संजय राठोड यांनी वाढलेल्या जबाबदारीचे आपल्याला भान असून जनतेची कामे अधिक जोमाने करण्यासाठी बळ मिळाल्याचे सांगितले. वन्यप्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी योग्य योजना राबविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नागरी सत्कार केल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले. यावेळी उत्तमराव शेळके, श्रीधर मोहोड यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Sanjay Rathod's civil hospitality in Darwah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.