वणीत महसूल अधिकाऱ्यासमक्ष रेती व्यावसायिकाने ट्रक पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:24+5:30

कार्यालयात कामकाज करित असताना एक इसम त्याच्या ट्रकमध्ये रेती भरून छोरिया ले-आऊटमधील रंगनाथ रेसीडेंसीच्यामागे ती रेती खाली करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मुकूंद देशपांडे व बन्सीलाल सिडाम हे दोघेही घटनास्थळी गेले. त्यावेळी त्याठिकाणी एम.एच.३४-एम.३६६१ क्रमांकाचा रेती भरलेला ट्रक उभा होता. यावेळी चालकाला रेती वाहतुकीचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता, त्याने नाही असे उत्तर दिले.

A sand trader hijacked a truck in front of a revenue officer in Wani | वणीत महसूल अधिकाऱ्यासमक्ष रेती व्यावसायिकाने ट्रक पळविला

वणीत महसूल अधिकाऱ्यासमक्ष रेती व्यावसायिकाने ट्रक पळविला

Next
ठळक मुद्देगुन्हे दाखल : मंडळ अधिकाºयाला दिली पाहून घेण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : संशयितरित्या रेती भरून उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी करण्यासाठी गेलेल्या महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्याला पाहून घेण्याची धमकी देत मुजोरीने ट्रक पळवून नेल्याप्रकरणी येथील रेती व्यावसायिक उमेश पोद्दार याच्याविरूद्ध वणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना गुरूवारी सायंकाळी स्थानिक छोरिया ले-आऊट परिसरात घडली.
या प्रकरणातील ट्रकचा चालक विकास कैलास तोडासे (२६) रा.रांगणा याला शुक्रवारी दुपारी वणी पोलिसांनी अटक केली, तर रेती व्यावसायिक उमेश पोद्दार हा अद्यापही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरालगतच्या गणेशपूर मंडळाचे मंडळ अधिकारी महेंद्र मुकूंद देशपांडे व तलाठी बन्सीलाल सिडाम हे दोघे छोरिया ले-आऊटमधील तलाठी कार्यालयात कामकाज करित असताना एक इसम त्याच्या ट्रकमध्ये रेती भरून छोरिया ले-आऊटमधील रंगनाथ रेसीडेंसीच्यामागे ती रेती खाली करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मुकूंद देशपांडे व बन्सीलाल सिडाम हे दोघेही घटनास्थळी गेले. त्यावेळी त्याठिकाणी एम.एच.३४-एम.३६६१ क्रमांकाचा रेती भरलेला ट्रक उभा होता. यावेळी चालकाला रेती वाहतुकीचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता, त्याने नाही असे उत्तर दिले. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी सदर ट्रक तहसील कार्यालयात लावण्यास सांगितले. चालकाने लगेच फोन करून ट्रकमालक उमेश पोद्दार याला त्याठिकाणी बोलावून घेतले. १० मिनीटातच उमेश पोद्दार तेथे पोहोचला. त्यानेदेखिल आपल्याकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. मात्र तहसील कार्यायात ट्रक लावण्यास नकार देत तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, मी तुम्हाला पाहून घेईल, अशी मुजोरीची भाषा केली व या दोघांनाही धक्का देऊन रेती तिथेच खाली केली व ट्रक घेऊन दोघेही पळून गेले. दरम्यान, यासंदर्भात माहिती दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी शरद जावळे व तहसीलदार श्याम धनमने तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ती रेती जप्त करून पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे यांच्यात तक्रारीवरून उमेश पोद्दार व ट्रकचालक विकास तोडासे या दोघांविरूद्ध भादंवि ३५३, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले.

पावसाळ्याच्या तोंडावर घाटावरून रेती पळविण्याचा सपाटा तस्करांनी सुरू केला आहे. हे तस्कर महसूल विभागातील कनिष्ठ कर्मचाºयांना जुमानत नसून ते महसूल विभागावर शिरजोर झाल्याचे चित्र वणी परिसरात पहायला मिळते.

Web Title: A sand trader hijacked a truck in front of a revenue officer in Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.