Sairat: जंगल सफारी... 'आर्ची'ला पाहायला 'सल्ल्या अन् लंगड्या' थेट टिपेश्वरच्या जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 03:23 PM2022-05-19T15:23:06+5:302022-05-19T15:24:11+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य येथे जंगल सफारीला सैराटफेम कलाकार लंगड्या उर्फ तानाजी गलगुंडे आणि सल्ल्या म्हणजेच अरबाज शेख यांनी हजेरी लावून आनंद लुटला

Sairat: Jungle safari ... sairat fame tanajau and arbaj khan to see 'Archie' tiger in the forest of Tipeshwar | Sairat: जंगल सफारी... 'आर्ची'ला पाहायला 'सल्ल्या अन् लंगड्या' थेट टिपेश्वरच्या जंगलात

Sairat: जंगल सफारी... 'आर्ची'ला पाहायला 'सल्ल्या अन् लंगड्या' थेट टिपेश्वरच्या जंगलात

Next

यवतमाळ : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत इतिहास घडवला. 100 कोटींच्या कमाई क्लबमध्ये जाणारा सैराट हा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाने जसे अनेक विक्रम केले, तसेच चित्रपटातील कलाकारांचं आयुष्यच या सिनेमानं बदलून गेलं. आर्चीची भूमिका करणाऱ्या रिंकू राजगुरुला या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर, परश्याही हिरोच बनला. परश्याच्या मित्रांची भूमिका करणाऱ्या सल्ल्या आणि लंगड्यालाही या सिनेमानं एका उंचीवर नेलं. आता, सैराट फेम हीच जोडी जंगल सफारीला आली आहे.  

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य येथे जंगल सफारीला सैराटफेम कलाकार लंगड्या उर्फ तानाजी गलगुंडे आणि सल्ल्या म्हणजेच अरबाज शेख यांनी हजेरी लावून आनंद लुटला. टिपेश्वर अभयारण्यातील आर्चीने सध्या सर्वांना भुरळ घातली आहे. त्याच अर्चिला पाहायला ही जोडी आली होती. आर्ची वाघीनीसह तिच्या 3 पिलांचे दर्शन घेत इतरही प्राणी, पक्षी  रोई, बंदर, हरीण, चितळे, यांचेही मनसोक्तपणे दर्शन घेतले. यावेळी वनविभाग अधिकारी ACF आर. बी. कोंगावार, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक येवतकर, एम.एच. 29 हेल्पिग हँडस टीमचे संस्थापक अध्यक्ष निलेश मेश्राम आणि गाईड सरफराज उपस्थित होते.

दरम्यान, या जंगल सफारीत तानाजीने बाईक रायडिंगही केले. तर, स्थानिकांशी दोघांनीही जंगल सफारीबद्दल संवाद साधला. 

Web Title: Sairat: Jungle safari ... sairat fame tanajau and arbaj khan to see 'Archie' tiger in the forest of Tipeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.