‘मेडिकल’मध्ये दर्जेदार रुग्णसेवेचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:27+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मनिष श्रीगिरिवार यांची नागपूर एम्स येथे बदली झाली. त्यानिमित्त ‘मेडिकल’मधील प्राध्यापक, कर्मचारी व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने त्यांचा संयुक्त सत्कार करून निरोप देण्यात आला. हा सोहळा ‘मेडिकल’च्या श्रोतृगृहात बुधवारी पार पडला.

Quality Medical Care Satisfaction in 'Medical' | ‘मेडिकल’मध्ये दर्जेदार रुग्णसेवेचे समाधान

‘मेडिकल’मध्ये दर्जेदार रुग्णसेवेचे समाधान

Next
ठळक मुद्देमनिष श्रीगिरिवार : रुग्णालय प्रशासनाच्यावतीने करण्यात आला कार्याचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बालपणापासून यवतमाळशी नाळ जुळली आहे आणि आता ती अधिक घट्ट झाली. टीका झाल्याने त्यातून काम करण्याची ऊर्जा मिळाली. गोरगरीब रुग्णांसाठी चांगले काम करता आले याचे समाधान आहे, असे प्रतिपादन ‘मेडिकल’चे मावळते अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांनी केले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मनिष श्रीगिरिवार यांची नागपूर एम्स येथे बदली झाली. त्यानिमित्त ‘मेडिकल’मधील प्राध्यापक, कर्मचारी व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने त्यांचा संयुक्त सत्कार करून निरोप देण्यात आला. हा सोहळा ‘मेडिकल’च्या श्रोतृगृहात बुधवारी पार पडला.
अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपअधिष्ठाता डॉ. संजय भारती, डॉ. बाबा येलके, डॉ. प्रभाकर हिवरकर, डॉ. रवींद्र राठोड उपस्थित होते. याशिवाय अभ्यागत मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. प्रवीण प्रजापती, प्रशासकीय अधिकारी प्रवीण लिहितकर, डॉ. गौतम खाकसे, प्रा.डॉ. गिरिश जतकर, डॉ. टी.सी. राठोड, मंगेश वैद्य, वनमाला राऊत, वंदना सयाम आदी उपस्थित होते. यावेळी ३५ पेक्षा जास्त सामाजिक व कर्मचारी संघटनांनी डॉ. मनिष श्रीगिरिवार यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी श्रीगिरिवार यांनी आपल्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. उपस्थितांनी श्रीगिरिवार यांच्याशी जुळलेल्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक डॉ. अजय कुडमेथे यांनी केले. संचालन सुनील मालके, तर आभार डॉ. सपना मोतेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. विजय डोंगरे, डॉ. शरद मानकर, डॉ. स्नेहल हिंगवे, डॉ. शेखर घोडेस्वार, डॉ. किरण भारती, डॉ. नीलिमा सुराणा, डॉ. अजय केशवानी, डॉ. अर्चना पुरी, मंगला ठाकरे, आनंद उमरे, अविनाश जानकर, नंदू फुकट, राजू शहाडे आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Quality Medical Care Satisfaction in 'Medical'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.