अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 02:30 PM2019-10-14T14:30:59+5:302019-10-14T14:31:13+5:30

उच्च न्यायालय मुंबई यांनी उमरखेड वकील संघाची मागणी मान्य करुन उमरखेड येथे जिल्हा सत्र न्यायालय चालू करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायधीश यवतमाळ यांना दिले आहेत.

Mumbai High Court Approves Additional District Sessions Court | अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी

Next

उमरखेड (यवतमाळ) :  येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची निर्मिती व्हावी यासाठी मागील अनेक वर्षापासून स्थानिक वकील संघटनेने उच्च न्यायालयाकडे पाठ पूरावा केल्या नंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्मिती करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाला दिला आहे .  

उमरखेड व महागाव तालुक्यातील पक्षकारांच्या सोईच्या दृष्टीने उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची निर्मिती व्हावी या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवी कंदील मिळाल्याने उमरखेड बायपास रोडलगत जयस्वाल स्टोन क्रेशर जवळील शासनाच्या इ वर्ग जमिनीवर नवीन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची नवीन इमारत उभारली जाणार असल्याची माहिती उमरखेड वकील संघाचे अध्यक्ष अॅड .भूषण देवसरकर व कोषाध्यक्ष अॅड .आस्मिता टाकणखारे यांनी दिली आहे .
        
उच्च न्यायालय मुंबई यांनी उमरखेड वकील संघाची मागणी मान्य करुन उमरखेड येथे जिल्हा सत्र न्यायालय चालू करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायधीश यवतमाळ यांना दिले आहेत. त्यामुळे आता उमरखेड येथे बायपासवर  जयस्वाल यांचे स्टोन क्रेशर लगत  शासनाच्या जागेत नवीन इमारत बांधण्यात येणार असून त्या ठिकाणी लवकरच जिल्हा सत्र न्यायालय उमरखेड चालू होणार आहे. या ठिकाणी उमरखेड व महागाव तालुक्यातील प्रकरणे चालणार आहेत, अशी माहिती वकिलांनी दिली आहे. यावेळी उमरखेड वकील संघाचे अध्यक्ष अॅड .  भूषण देवसरकर व कोषाध्यक्ष अॅड . अस्मिता टाकणखारे उपस्थित होते.

Web Title: Mumbai High Court Approves Additional District Sessions Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.