Monkey Bites of Woman in Sandeep Talkies area | संदीप टॉकीज परिसरात माकडाचा महिलांना चावा
संदीप टॉकीज परिसरात माकडाचा महिलांना चावा

ठळक मुद्देदोन दिवसांपासून धुमाकूळ : पाच जण रुग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भरवस्तीत माकडाने धुमाकूळ घालून अनेकांना चावा घेतला. यातील पाच महिलांवर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. शहरातील संदीप टॉकीज परिसरात झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. माकडाच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने मोहीम हाती घेतली आहे.
गेली चार-पाच दिवसांपासून येथील संदीप टॉकीज परिसरातील गेडामनगर, अग्रवाल ले-आऊट, बांगरनगर या भागात माकडाने हैदोस मांडला. ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात चावा घेतला जात आहे. प्रामुख्याने या माकडाने महिलांना आपले लक्ष्य केले आहे. पायाला चावा घेऊन जखमी केले जात आहे. खोलवर झालेल्या जखमेला टाके दिले जात आहे. अशाच प्रकारे जखमी झालेल्या पाच महिला वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे. माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

माकडाने चावा घेतल्याची तक्रार प्राप्त होताच वन कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला. मात्र संबंधित परिसरात रविवारी माकड गवसले नाही. आढळल्यास बेशुद्ध करण्याच्या इंजेक्शनचा प्रयोग करून पकडण्यात येईल.
- भास्कर मडावी
वनपाल, वाघापूर


Web Title: Monkey Bites of Woman in Sandeep Talkies area
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.