लॉकडाऊन काळात पुसदच्या सर्पमित्राची भूतदया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:23+5:30

‘आधी केले, मग सांगितले’, या उक्तीप्रमाणे आपले आयुष्य वेचणारे संत, महात्मे विदर्भभूमित होऊन गेले. त्यात संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा समावेश आहे. भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, मुक्या प्राणी मात्रांवर दया दाखवा, या कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा धागा पकडून कोरोना संकटामुळे लॉकडाऊनच्या काळात येथील एका शिक्षकाने वन्यप्राणी व पशूसेवा करण्याचा वसा घेतला.

The kindness of Pusad's snake friend during the lockdown | लॉकडाऊन काळात पुसदच्या सर्पमित्राची भूतदया

लॉकडाऊन काळात पुसदच्या सर्पमित्राची भूतदया

googlenewsNext
ठळक मुद्देनित्य उपक्रम, खंडाळा घाटात भर उन्हात गायी, वानरांची तहान-भूक भागविण्यासाठी आटापिटा

प्रकाश लामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : लॉकडाऊनमुळे मानवच नव्हे तर, प्राणीसुद्धा संकटात सापडले आहे. या काळात येथील एका शिक्षकाने भूतदया दाखवून त्यांची सेवा सुरू केली आहे.
‘आधी केले, मग सांगितले’, या उक्तीप्रमाणे आपले आयुष्य वेचणारे संत, महात्मे विदर्भभूमित होऊन गेले. त्यात संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा समावेश आहे. भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, मुक्या प्राणी मात्रांवर दया दाखवा, या कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीचा धागा पकडून कोरोना संकटामुळे लॉकडाऊनच्या काळात येथील एका शिक्षकाने वन्यप्राणी व पशूसेवा करण्याचा वसा घेतला. तालुक्यातील खंडाळा घाटात भर उन्हात मोकाट गायींसह वानरांची तहान-भूक भागविण्याचा नित्य उपक्रम राबविणाऱ्या या देवदूताचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राजेश आंबेकर हे स्थानिक इटावा वॉर्डातील रहिवासी आहे. सर्पमित्र म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. बेलोरा येथील शिवाजी विद्यालयात ते कला शिक्षक आहे. गेल्या ३० वर्षांपासून सर्पमित्र व प्राणीमित्र म्हणून ते परिचित आहे. कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली अन् प्रत्येकजण घरात ‘लॉकडाऊन’ झाला.
मात्र वन्यप्राणी व पशूसेवेचा पिंड असलेल्या राजेश आंबेकर यांनी तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ यांच्या परवानगीने पुसद-वाशिम मार्गावरील खंडाळा घाटातील मोकाट गायी व माकडांची तहान-भूक भागविण्याचा नित्यक्रम सुरू केला आहे.
एका चारचाकी वाहनातून मोठ्या चार ते पाच कॅन पाणी व खाद्यपदार्थ घेऊन सकाळी १० वाजताच्या सुमारास ते खंडाळा घाट गाठतात. तेथे त्यांच्या वाहनाचा आवाज येताच माकडे व गायी आनंदाने त्यांच्याभोवती गोळा होतात.

मुक्या प्राण्यांच्या सेवेतून समाधान
लॉकडाऊन असल्याने वेळ भरपूर आहे. भर उन्हात मुक्या प्राण्यांचे काय?, असा प्रश्न डोक्यात होता. त्यातून दररोज मुक्या प्राण्यांची तहान व भूक भागविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राजेश आंबेकर यांनी सांगितले. या प्राण्याची सेवा करण्यात खूप समाधान मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संत, महात्मे यांचे विचार प्रत्यक्षात
विदर्भभूमीतील अनेक संत, महात्म्यांनी मुके प्राणी आणि निसर्गाविषयी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांनी निसर्गाची जोपासना करण्याची शिकवण दिली. त्यांचेच विचार प्रत्यक्षात उतरवून राजेश आंबेकर मुक्या प्राण्यांची सेवा करीत आहे. संत आणि महात्म्यांचे विचार पुस्तकातच न ठेवता त्यांचे प्रत्यक्ष अनुकरण करीत आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Web Title: The kindness of Pusad's snake friend during the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.