टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 09:13 PM2019-07-23T21:13:24+5:302019-07-23T21:13:46+5:30

यवतमाळातील युवकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणे माझे वैयक्तिक उद्दीष्ट आहे. समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी याही बाजूने विचार करणे आवश्यक आहे. येथील युवकांनी गुन्हेगारी टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्यावे, असे आवाहन यवतमाळचे नवनियुक्त अपर जिल्हा पोलीस अधीक्षक (आयपीएस) नुरुल हसन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

Instead of being a gang, focus on education | टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्या

टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्या

Next
ठळक मुद्देनुरुल हसन : युवकांना चांगल्यासाठी प्रोत्साहित करणे वैयक्तिक उद्दिष्ट, बदल घडविण्याचा प्रयत्न करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळातील युवकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणे माझे वैयक्तिक उद्दीष्ट आहे. समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी याही बाजूने विचार करणे आवश्यक आहे. येथील युवकांनी गुन्हेगारी टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्यावे, असे आवाहन यवतमाळचे नवनियुक्त अपर जिल्हा पोलीस अधीक्षक (आयपीएस) नुरुल हसन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
प्रतिकूल परिस्थितीतून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनतीची आवश्यकता असते. मीसुद्धा २०१५ च्या बॅचचा आयपीएस आहे. मात्र इथवरचा माझा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरू शकतो. चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या कुटुंबात जन्म झाला. झोपडपट्टीमध्ये कच्चे घर होते. या परिसरात दूरदूरपर्यंत शिक्षणासाठी अनुकूल असे कुठलेच वातावरण उपलब्ध नव्हते. अशाही स्थितीत आपली वाट निवडत कठोर परिश्रमाने बी.टेक इलेक्ट्रीकल्सची पदवी प्राप्त केली. त्यानंतर एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी सुरू केली. मात्र ते अंतिम ध्येय नसल्याने अभ्यास सुरु होता. त्यानंतर भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. चार वर्षे येथे काम करताना सोबतच आयपीएसची तयारी सुरू केली. वयाच्या २८ व्या वर्षी (२०१५ मध्ये) आयपीएस झालो. तेव्हापासून समाजातील प्रत्येक युवकात बदल घडविण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले. युपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मदत व मार्गदर्शनासाठी नेहमीच तयार असल्याचेही हसन यांनी सांगितले.
जिल्ह्याकडून खूप काही शिकायचे आहे
यवतमाळ जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे. येथून खूप साºया गोष्टी शिकायच्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनात काम करायचे आहे. त्यांनी ठरवून दिलेल्या दिशेने काम करत येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची आहे. सध्या तरी जिल्ह्यातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रलंबित गुन्हे तत्काळ निकाली काढण्यासाठी, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शिवाय समाजात सशक्त पोलिसींग दिसली पाहिजे याकरिता एसपींच्या मार्गदर्शनात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Instead of being a gang, focus on education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस