अज्ञात आजाराने नेर येथे कोंबड्या मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:00 AM2021-03-13T05:00:00+5:302021-03-13T05:00:07+5:30

नेर येथील मुबारकनगरातील शेख नदीम यांच्या ५० हून अधिक कोंबड्यांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. कुक्कुटपालन करणाऱ्यांनी कोंबड्या विकून पर्यायी व्यवसाय शोधले आहेत. अज्ञात आजाराने कोंबड्या दगावत असल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शेख नदीम यांच्या मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या बेरड   (आशल) प्रजातीच्या असून, त्या लढाऊ म्हणून ओळखल्या जातात. बाजारात याची किंमत प्रत्येकी १००० ते १५०० पर्यंत आहे.

Hens die at Ner of unknown disease | अज्ञात आजाराने नेर येथे कोंबड्या मृत्यूमुखी

अज्ञात आजाराने नेर येथे कोंबड्या मृत्यूमुखी

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांत भीती; कुक्कुटपालन चालकांमध्ये चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : बर्ड फ्लूची दहशत संपत नाही तोच अज्ञात आजाराने कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याने लोकांसह कुक्कुटपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहरात गेल्या आठ दिवसांत एकाच व्यक्तीच्या ५० हून अधिक कोंबड्या मरण पावल्या.
नेरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे. याची लोकांमध्ये भीती आहे. बहुतांश नागरिक सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकांचे व्यवसाय या कारणामुळे मोडकळीस आले आहे. यातच कोंबड्यांना नवीन आजाराची लागण झाली आहे. ताप येऊन कोंबड्या मृत्युमुखी पडतात. 
नेर येथील मुबारकनगरातील शेख नदीम यांच्या ५० हून अधिक कोंबड्यांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. कुक्कुटपालन करणाऱ्यांनी कोंबड्या विकून पर्यायी व्यवसाय शोधले आहेत. अज्ञात आजाराने कोंबड्या दगावत असल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शेख नदीम यांच्या मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या बेरड   (आशल) प्रजातीच्या असून, त्या लढाऊ म्हणून ओळखल्या जातात. बाजारात याची किंमत प्रत्येकी १००० ते १५०० पर्यंत आहे. याबाबत पशुचिकित्सालयाचे डॉ. स्वप्निल महाडकर यांच्याशी संपर्क केला असता, कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्याची शक्यता नाकारली. प्रत्येक कुक्कुट व्यावसायिकांनी पास्क व रानीखेत लसीकरण नियमित करावे, असे ते म्हणाले. मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे शवविच्छेदन केल्यावरच अज्ञात आजाराचे निदान होईल, असे त्यांनी सांगितले. ५० हून अधिक कोंबड्या अज्ञात आजाराने दगावल्या. हा आजार परिसरात पसरू नये, यासाठी पशुचिकित्सा विभागाने उपाययोजना कराव्या, असे मत शेख नदीम यांनी व्यक्त केले.

Web Title: Hens die at Ner of unknown disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.