प्रियकराच्या मदतीने सावत्र आईने केला मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 02:35 PM2020-08-11T14:35:09+5:302020-08-11T14:36:11+5:30

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानेच मुलाचा सावत्र आई व तिच्या प्रियकराने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

With the help of her boyfriend, the stepmother killed the child | प्रियकराच्या मदतीने सावत्र आईने केला मुलाचा खून

प्रियकराच्या मदतीने सावत्र आईने केला मुलाचा खून

Next
ठळक मुद्देअनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याचे निष्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानेच मुलाचा सावत्र आई व तिच्या प्रियकराने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मोझर येथील कमलेश दमडू चव्हाण (३२) या विवाहिताच्या मृत्यूप्रकरणातील हे वास्तव आहे. आई व प्रियकर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

कमलेश चव्हाण याचा मृतदेह ४ ऑगस्ट रोजी सकाळी मोझर येथील स्मशानभूमीत आढळून आला. सर्वांगावर जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र हे कृत्य कुणी केले असावे याचा शोध लागला नव्हता. उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, नेरचे ठाणेदार प्रशांत मसराम, पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील निराळे, गजानन पत्रे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक सचिन पवार यांनी या प्रकरणाचा कसून शोध घेतला. यात कमलेशची आई व तिच्या प्रियकरानेच खून केल्याचे स्पष्ट झाले.

सावत्र आई शोभा दमडू चव्हाण (५०) व तिचा प्रियकर नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाळे (४२) या दोघातील संबंध कमलेशला पटत नव्हते. याच कारणावरून त्यांच्यात वाद होत होता. ३ ऑगस्टच्या रात्री कमलेशला घरातच अर्धमेले केले. नरेंद्र ढेंगाळे याने त्याला उचलून स्मशानभूमीत आणले. याठिकाणी त्याच्यावर चाकूने वार केले. दारूच्या फुटलेल्यी शिशीनेही त्याला भोसकले. सदर दोघांनी पोलिसांपुढे हा सर्व घटनाक्रम उलगडला. या प्रकरणाच्या तपासात ठाणेदार प्रशांत मसराम, पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील निराळे, राऊत, कासम निंसुरीवाले, रोशन गुजर, अनिल डोकडे, योगेश सलामे, राजेश चौधरी, राजेश भगत, सचिन डहाके, ऋषिकेश इंगळे, किरण पडघम, सचिन तंबाके, नीलेश तिडके, एलसीबीचे पोलीस निरिक्षक सचिन पवार, विशाल भगत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

पहारेकऱ्यामुळे गूढ उकलले
कमलेशची आई व तिचा प्रियकर हे दोघेच घरात होते. बाहेरून कुणी आल्यास माहिती मिळावी यासाठी त्यांनी घराबाहेर पंकज कावरे नामक व्यक्तीला पहारेकरी म्हणून ठेवले होते. झालेल्या सर्व प्रकाराचा तो साक्षीदार होता. सहा दिवसानंतर हे सर्व प्रकरण पोलिसांच्या प्रयत्नानंतर पुढे आले.

Web Title: With the help of her boyfriend, the stepmother killed the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून