नेर, यवतमाळमध्ये पावसाची मुसळधार एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:00:02+5:30

सोमवारी रात्री १ वाजताच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. यवतमाळ शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तलावफैलातील गवळीपुरा, बेंडकीपुरा येथील मुख्य नाली तलाव सौंदर्यीकरणाच्या कामामुळे बंद झाली. यामुळे पावसाचे पाणी परिसरातील १३ घरांमध्ये शिरले. तेथील नागरिकांना संपूर्ण रात्र बाहेर काढावी लागली. मोठे आर्थिक नुकसानही झाले. पावसामुळे धोका उद्भवणार याबाबत येथील नगरसेवक गजानन इंगोले यांनी नगरपालिका प्रशासनाला सुचित केले होते.

Heavy rains in Ner, Yavatmal | नेर, यवतमाळमध्ये पावसाची मुसळधार एन्ट्री

नेर, यवतमाळमध्ये पावसाची मुसळधार एन्ट्री

Next
ठळक मुद्देनदी-नाल्यांना पूर : नेर तालुक्यातील मिलमिली नदीसह यवतमाळ शहरातही सखल भागात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या २४ तासात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ८.५ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस नेर तालुक्यात झाला आहे. २४ तासात तेथे ५६.६ मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळला. त्या खालोखाल यवतमाळ तालुक्यात २०.१ मिमी पाऊस झाला. या दोन्ही ठिकाणी पावसाने शेतीचे नुकसान केले. नेरमधील पिंपरी, धनज माणिकवाडा, पाथ्रडगोळे, मांगलादेवी या गावांना चांगलाच तडाखा बसला. नेर शहरालगतच्या मिलमिली नदीलाही पूर आला होता.
सोमवारी रात्री १ वाजताच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. यवतमाळ शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तलावफैलातील गवळीपुरा, बेंडकीपुरा येथील मुख्य नाली तलाव सौंदर्यीकरणाच्या कामामुळे बंद झाली. यामुळे पावसाचे पाणी परिसरातील १३ घरांमध्ये शिरले. तेथील नागरिकांना संपूर्ण रात्र बाहेर काढावी लागली. मोठे आर्थिक नुकसानही झाले. पावसामुळे धोका उद्भवणार याबाबत येथील नगरसेवक गजानन इंगोले यांनी नगरपालिका प्रशासनाला सुचित केले होते. मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.
दीर्घ उघाडीनंतर पावसाने जिल्ह्यात पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार झरीजामणी, केळापूर, घाटंजी हे तीन तालुके वगळता सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मांगलादेवीजवळील मिलमिली नदीला पूर आला. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मांगलादेवी येथील शेतकरी प्रदीप उंबरे, मनोज उमरतकर, अनिल पुनसे, भरत कुंभारखाने, अरविंद इळपाते आदींनी नेर तहसीलदारांना निवेदन दिले.

पाथ्रडगोळेमध्ये बैल वाहून गेला
नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे येथे मुसळधार पावसाने लगतच्या नाल्याचे पाणी गावात व शेतात शिरले. यात गोठ्यात बांधून असलेला बैल वाहून गेला. संत्रा, कपाशी, सोयाबीन, भेंडी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावातील तुषार गावंडे, पवन गावंडे, दिलीप गावंडे, श्रीकृष्ण गावंडे, विकास गावंडे यांच्यासह इतरही शेतकऱ्यांचे जमीन खरडल्याने नुकसान झाले.

धनज, मुखत्यारपूर येथे ढगफुटी सदृश पाऊस
सोमवारी रात्री २ वाजताच्या सुामरास धनज, मुखत्यारपूर (ता.नेर) येथे जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक ढगफुटीसारखा पाऊस कोसळायला लागला. त्यामुळे लहान-मोठ्या नाल्यांना पूर आला. शेतशिवारातही पाण्याचे लोंढे वाहून लागले. अनेक शेतकांना तलावाचे स्वरूप आले होते. मंगळवारी दुपारपर्यंत पाण्याचा निचरा झालेला नव्हता. पंजाबराव खोडके, करीम खॉ, एकनाथ तिखे, संदीप भांगे, सुनील ढोकणे, रवींद्र बनसोड, राजीव तिखे, कैलास तिखे, नितीन इंगळे, राजीव जोल्हे, सुभाष लुनावत, जमीर मिर्झा, किशोर अलोणे, रवींद्र दाभोरे, संभादास कळसकर यांच्या शेताचे नुकसान झाले.
 

Web Title: Heavy rains in Ner, Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस