हरियाणाची ३० लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:00 AM2020-09-12T05:00:00+5:302020-09-12T05:00:22+5:30

आरोपींंमध्ये विनोदकुमार राजपुत रा. इटावा उत्तरप्रदेश, दिनेश येंडाळे, निकेत पडडाखे, नितीन कळमकर सर्व रा. वर्धा, सतीश येंडाळे रा. अकोला व अमोल कांबळे रा. चंदननगर नागपूर यांचा समावेश आहे. या धाडीत इम्पेरियल ब्ल्यू व्हिसकी, मार्बल पावडर व साहित्य असा २९ लाख ९५ हजार ६०० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

Haryana liquor worth Rs 30 lakh seized | हरियाणाची ३० लाखांची दारू जप्त

हरियाणाची ३० लाखांची दारू जप्त

Next
ठळक मुद्देसहा जणांना अटक : ‘एक्साईज’ची मोर गोडावून इस्टेटवर धाड

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी येथील डोर्ली-डोळंबाच्या मोर गाडावून इस्टेटमध्ये धाड घातली. तेथून हरियाणातील ३० लाख रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली.
आरोपींंमध्ये विनोदकुमार राजपुत रा. इटावा उत्तरप्रदेश, दिनेश येंडाळे, निकेत पडडाखे, नितीन कळमकर सर्व रा. वर्धा, सतीश येंडाळे रा. अकोला व अमोल कांबळे रा. चंदननगर नागपूर यांचा समावेश आहे. या धाडीत इम्पेरियल ब्ल्यू व्हिसकी, मार्बल पावडर व साहित्य असा २९ लाख ९५ हजार ६०० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. शिवाय अशोक लेलॅन्ड कंपनीचा १७ लाख रुपये किंमतीचा दहा चाकी ट्रक, टाटा कंपनीचा साडेतीन लाख रुपये किंमतीचा पिकअप वाहन, हुंडाई असेट कंपनीची दीड लाखांची कार जप्त केली गेली.
डोर्ली-डोळंबा येथे हरियाणातील दारूसाठा उतरविला जात असल्याची टीप राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार एक्साईज एसपी सुरेंद्र मनपिया यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक आर.के. तायकर यांच्या नेतृत्वात धाड घालण्यात आली. एक्साईजचे पथक पोहोचले तेव्हा हरियाणा राज्यातील विदेशी मद्य दुसऱ्या वाहनामध्ये भरत असताना आढळून आले. एक्साईजने तेथील संपूर्ण माल जप्त केला. महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक केली गेली. या कारवाईत निरीक्षक ए.वाय. खांदवे, दुय्यम निरीक्षक एस.एम. मेश्राम, सहायक दुय्यम निरीक्षक आर.एम. राठोड, कॉन्स्टेबल एम.पी. शेंडे, एम.जी. रामटेके, बी.सी. मेश्राम, आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Haryana liquor worth Rs 30 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.