शासकीय कार्यालये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अद्याप प्रतीक्षेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:00 AM2020-11-21T05:00:00+5:302020-11-21T05:00:02+5:30

सदर प्रतिनिधीने शुक्रवारी दुपारी काही कार्यालयांचा फेरफटका मारला असता कुठे अर्ध्या तर कुठे त्या पेक्षाही कमी कर्मचाऱ्यांवर कार्यालय सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले. पळसवाडी कॅम्प स्थित समाज कल्याण कार्यालयात निवडक कर्मचारी होते. लोकल फंडच्या एका कार्यालयात केवळ एक कर्मचारी होती. तर लेखा परीक्षकाच्या दुसऱ्या कार्यालयात एक महिला व दोन पुरुष कर्मचारी उपस्थित होते. कोरोना काळात शासकीय कर्मचारी अनेक महिने घरी होते. त्यामुळे जनतेची कामे रखडली होती.

Government office officials, employees are still waiting | शासकीय कार्यालये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अद्याप प्रतीक्षेतच

शासकीय कार्यालये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अद्याप प्रतीक्षेतच

Next
ठळक मुद्देदिवाळी संपता संपेना : बीएसएनएल, पालिकेतही अनेक खुर्च्या रिकाम्या

 रूपेश उत्तरवार
    लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :  शासकीय कार्यालयांमधील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी अद्याप संपलेली नाही. सलग तीन दिवस सुट्या आल्यानंतरही कित्येकांनी आणखी सुट्या टाकून कार्यालय सोडले. 
सदर प्रतिनिधीने शुक्रवारी दुपारी काही कार्यालयांचा फेरफटका मारला असता कुठे अर्ध्या तर कुठे त्या पेक्षाही कमी कर्मचाऱ्यांवर कार्यालय सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले. पळसवाडी कॅम्प स्थित समाज कल्याण कार्यालयात निवडक कर्मचारी होते. लोकल फंडच्या एका कार्यालयात केवळ एक कर्मचारी होती. तर लेखा परीक्षकाच्या दुसऱ्या कार्यालयात एक महिला व दोन पुरुष कर्मचारी उपस्थित होते. कोरोना काळात शासकीय कर्मचारी अनेक महिने घरी होते. त्यामुळे जनतेची कामे रखडली होती. किमान आता पूर्ण क्षमतेने कार्यालय सुरू झाल्याने कामे वेगवान होणे अपेक्षित आहे. परंतु यंत्रणेची दिवाळी संपता संपत नसल्याचे चित्र आहे. 

कामासाठी मजूर प्रतीक्षेत
रोजगार हमी योजनेच्या येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली असता, मॅडम व्हीसी मिटींगला गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी तेथे हाताला काम द्या म्हणून तक्रार घेऊन आलेल्या मजुरांची गर्दी होती. नंतर मॅडमनी येऊन त्यांच्या अडचणी सोडविल्या. 
सर्व कार्यालये सारखीच
सदर प्रतिनिधीने प्रातिनिधीक स्वरूपात भेट दिली असता नगरपरिषद यवतमाळ, पंचायत समिती यवतमाळ, भूमीअभिलेख विभाग या कार्यालयांना भेट दिली असता अवघ्या काही कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले. इतरत्रही स्थिती अशीच आहे. 
कोरोना सारखी स्थिती
कोरोना काळात ज्या पद्धतीने अवघ्या निवडक व महत्वाच्या कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन कामकाज चालविले जात होते. अगदी तशीच स्थिती दिवाळीच्या या काळात अनेक शासकीय कार्यालयांमध्ये पहायला मिळाली. दिवाळी की कोरोना असा संभ्रम झाला. 

 

Web Title: Government office officials, employees are still waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी