आश्रमशाळांवर सोलर हायमास्टचा फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:22 PM2019-08-24T22:22:25+5:302019-08-24T22:23:29+5:30

यवतमाळ तालुक्यातील कापरा, चिचघाट, हिवरी, मारेगाव तालुक्यातील बोटोणी, घाटंजी तालुक्यातील जांब, कळंब तालुक्यातील नांझा, अंतरगाव, राळेगाव तालुक्यातील किन्हीजवादे, पांढरकवडा तालुक्यातील कारेगाव, झरी तालुक्यातील शिबला येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोलर हायमास्टच्या उजेडाने उजळून निघणार आहे.

Focus of solar highmasters on ashram schools | आश्रमशाळांवर सोलर हायमास्टचा फोकस

आश्रमशाळांवर सोलर हायमास्टचा फोकस

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना दिलासा । पांढरकवडा आदिवासी प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वस्तीपासून काहीशा दूर आणि जंगलालगत असलेल्या आश्रमशाळांचा परिसर रात्रीच्या वेळी किर्र अंधाराच्या तावडीत असतो. त्यामुळे तेथे निवासी राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना भीतीतच रात्र काढावी लागते. या दु:खाची दखल घेत आश्रमशाळांचा परिसर लख्ख उजेडाने उजळून टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सोलर हायमास्ट बसविण्यात येणार आहे.
पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. महाउर्जाच्या जिल्हा व्यवस्थापकांकडे हायमास्ट बसवून देण्यासंदर्भात प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी प्रस्ताव सादर केला आहे. जिल्ह्यात असलेल्या संपूर्ण २५ शासकीय आश्रमशाळांसाठी ही सुविधा करून दिली जाणार आहे. तूर्त १० शाळांकरिता हा प्रस्ताव देण्यात आला आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला महाउर्जातर्फेही हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. पुढील आठ दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबरमध्येच आश्रमशाळांमध्ये सोलर हायमास्ट कार्यान्वित करण्यात येणार आहे. तर उर्वरित शाळांमध्येही डिसेंबरपर्यंत सोलर हायमास्ट बसविण्यासाठी प्रकल्प अधिकाºयांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
या शाळा चकाकणार
यवतमाळ तालुक्यातील कापरा, चिचघाट, हिवरी, मारेगाव तालुक्यातील बोटोणी, घाटंजी तालुक्यातील जांब, कळंब तालुक्यातील नांझा, अंतरगाव, राळेगाव तालुक्यातील किन्हीजवादे, पांढरकवडा तालुक्यातील कारेगाव, झरी तालुक्यातील शिबला येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोलर हायमास्टच्या उजेडाने उजळून निघणार आहे. तर पांढरकवडा प्रकल्प कार्यालयातील उर्वरित आश्रमशाळा आणि पुसद प्रकल्पातील ७ शासकीय आश्रमशाळांमध्ये डिसेंबरपर्यंत हायमास्ट बसविण्यात येईल, अशी माहिती प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी दिली.

पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रकल्प कार्यालयाने हा प्रस्ताव दिला. प्रत्येक हायमास्टसाठी दीड लाखाचा खर्च येणार आहे. आठ शाळांच्या हायमास्टचा खर्च प्रकल्प कार्यालय करणार असून हिवरी आणि अंतरगावच्या शाळेसाठी पालकमंत्र्यांनी आपल्या फंडातून निधी दिला. रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांच्या जिविताला असलेला धोका लक्षात घेऊन ही व्यवस्था केली जात आहे.
- आत्माराम धाबे, प्रकल्प अधिकारी, पांढरकवडा

Web Title: Focus of solar highmasters on ashram schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा