नेर तहसीलसमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:34 PM2019-10-30T23:34:57+5:302019-10-30T23:35:36+5:30

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पिकविमा यासह नुकसान भरपाई मिळावी, नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा सर्व्हे तलाठी व कृषी सहाय्यक संयुक्तपणे करत आहे. प्रत्येक शेतापर्यंत ते पोहचू शकत नाही. वीमा प्रतिनिधी एकटाच असल्याने शेताच्या बांधावर जाऊ शकणार नाही.

Farmers' plots in front of Ner Tehsil | नेर तहसीलसमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

नेर तहसीलसमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देपावसामुळे पिकांचे नुकसान : सरसकट मदत आणि विमा अर्जाला मुदतवाढ द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : अवकाळी पावसाने नेर तालुक्यात थैमाने घातले. पिवळे सोने सोयाबीन आणि आणि पांढरे सोने कापूस खराब झाले आहे. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना सरसकट मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी शेतकºयांनी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या दिला.
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पिकविमा यासह नुकसान भरपाई मिळावी, नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा सर्व्हे तलाठी व कृषी सहाय्यक संयुक्तपणे करत आहे. प्रत्येक शेतापर्यंत ते पोहचू शकत नाही. वीमा प्रतिनिधी एकटाच असल्याने शेताच्या बांधावर जाऊ शकणार नाही. जवळपास नुकसानग्रस्त शेतकºयांनी वीमा काढला आहे. त्यांना सरसकट मदत मिळावी आणि अर्ज करण्याची मुदत पाच दिवस ठेवावी अशी, आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
या आंदोलनात उमरठा येथील सरपंच प्रभा खोडे, श्रीधर महल्ले, गणेश भुसे, पिंटू खोडे, सुमित गावंडे, संतोष कोल्हे, रितेश गावंडे, विकास गवई, गजानन चावके, प्रवीण खोडे, पंकज गावंडे, अभिलेष भोयर, प्रकाश यशवंते, दिगांबर अघम, दिनेश गावंडे, शिलानंद गजभिये, सदाशिव गावंडे, राहुल खडसे, संदीप सावरकर, संजय लोखंडे, प्रवीण राठोड, सूरज गावंडे आदी सहभागी झाले होते.

प्रहारचे तहसीलदारांना निवेदन
पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचा विमा अर्ज भरण्याला मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तालुका संयोजक गोपाल चव्हाण, गौरव नाईकर, राजेंद्र कातोरे, नितीन रणमले, दिनेश गावंडे, मिनेश राठोड, सुभाष गायकवाड, धनंजय वानखडे, कुणाल जमदाळे, सुदाम राठोड, प्रेमनाथ तानबाले आदींची उपस्थिती होती.

Web Title: Farmers' plots in front of Ner Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.