शेतकऱ्याची साखळी नदीच्या डोहात उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 10:54 PM2019-09-10T22:54:09+5:302019-09-10T22:55:00+5:30

नेर तालूक्यातील सावरगाव (काळे) येथे साखळी नदीच्या डोहात उडी मारून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.

Farmer commits suicide in Yavatmal | शेतकऱ्याची साखळी नदीच्या डोहात उडी मारून आत्महत्या

शेतकऱ्याची साखळी नदीच्या डोहात उडी मारून आत्महत्या

Next

 यवतमाळ - नेर तालूक्यातील सावरगाव (काळे) येथे साखळी नदीच्या डोहात उडी मारून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. विशेष म्हणजे तीन महीण्यापूर्वी याच शेतकऱ्याच्या मूलाने याच डोहाजळील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. मुलाच्या प्रेमाला मूकलेल्या पित्याने डोहात उडी मारून आत्महत्या केली.

रामहरी श्रावन शिनगारे(६८) असे या शेतकऱ्यांचे नाव आहे त्यांच्याकडे पाच एकर शेती असून, या शेतीवर त्याच्या परीवाराची उपजीविका चालायची. मात्र सततच्या नापिकीने खाजगी सावकार व सहकारी सोसायटीचे कर्ज भरने अशक्य झाले होते.  या दयनीय परीस्थितीला कंटाळून त्याचा मुलगा शिद्धेश्वर रामहरी शिनगारे याने ब्राम्हणवाडा रोडवरील डोहाजळील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. दरम्यान शिनगारे परिवार हे दुख झेलत असताना कर्जाचा डोंगर संपत नव्हता. सहकारी सोसायटीचे 60 हजार कर्ज कसे फेडावे या विंचनेत तो होता.  

पुत्र विरहाच्या वेदना सुपरूच अंसताना रामहरी शिनगारे याने दुपारी चार वाजता साखळी नदीच्या डोहात उडी मारून आत्महत्या केली. रामहरी ने उडी मारताच जवळपासच्या शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. पण तोपर्यत डोहात बूडून रामहरीचा मृत्यू झाला होता. तिन महीण्यातच मुलाच्या मृत्यू नंतर पित्याने आत्महत्या केल्याने सावरगाव येथे शोककळा पसरली आहे. मृतक शेतकऱ्यांच्या मागे पत्नी, एक मूलगा, विधवा सून,  नातू असा परीवार आहे.

Web Title: Farmer commits suicide in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.