बाभूळगावात बोगस बियाण्यांचा केला पर्दाफाश; ४०० पाकिटे, चारचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 20:01 IST2025-06-10T19:57:15+5:302025-06-10T20:01:37+5:30

पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल : १२ लाख १६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

Fake seeds busted in Babhulgaon; 400 packets, four-wheeler seized | बाभूळगावात बोगस बियाण्यांचा केला पर्दाफाश; ४०० पाकिटे, चारचाकी जप्त

Fake seeds busted in Babhulgaon; 400 packets, four-wheeler seized

लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव :
शासनाने प्रतिबंधित केलेल्या कापूस बियाण्यांवर पोलिस व कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून सोमवारी धाड टाकली. ४०० बियाणे पाकिटांसह चारचाकी वाहन जप्त करून आरोपींवर पोलिस ठाण्यात गुन्हे दखल केले. या कारवाईमुळे बोगस बियाण्यांचा पर्दाफाश झाला आहे. बाभूळगाव येथे एमएच २९ सीबी २६९० क्रमांकाच्या चारचाकीने प्रतिबंधित कापूस बियाण्याची वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने चालक प्रवीण वासुदेव साखरकर (वय २९, रा. गवंडी) याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने रमेश सुखदेव लांजेवार (वय ५७, रा. गवंडी), किशोर रामराव वाटमोडे (वय ४९, रा. गवंडी) या दोघांच्या मदतीने बियाणे विक्री केल्याचे सांगितले. 


पथकाने या दोघांच्या ताब्यातून पाच लाख १६ हजार ७५० रुपयांचे प्रतिबंधित बियाण्यांचे ४०० पाकिटे, सात लाखांची दोन चारचाकी वाहने असा एकूण १२ लाख १६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कृषी अधिकारी किशोर अंबरकर यांच्या तक्रारीवरून बाभूळगाव पोलिसांनी तिघांवर बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कापूस बियाणे अधिनियम २००९, कापूस किंमत नियंत्रण कायदा २०१५ अंतर्गत गुन्हे दाखल केले. ही कारवाई ठाणेदार एल. डी. तावरे, एपीआय हेमंत चौधरी, मोहीम अधिकारी प्रवीण जाधव, तालुका कृषी अधिकारी श्रुतिका ढेरे, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज मोहेकर, मंडळ कृषी अधिकारी सुरेश गावंडे, कृषी अधिकारी संजय पवार, विस्तार सी. एस. हेडाऊ, पोलिस कर्मचारी विजय लोखंडे, गणेश शिंदे, नीलेश भुसे, दिनेश अहिरे, भूषण बिरे यांनी केली.

 

Web Title: Fake seeds busted in Babhulgaon; 400 packets, four-wheeler seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.