‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे उद्या वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:07+5:30

सरपंचांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. याकरिता ग्रामपंचायतींकडून त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मागविण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध गावच्या प्रवेशिका सरपंच अवॉर्डसाठी दाखल झाल्या होत्या. यातून परिक्षकांनी पुरस्कारासाठी गावांची निवड केली. या सर्व सरपंचांना या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे.

Distribution of 'Lokmat Sarpanch Award' tomorrow | ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे उद्या वितरण

‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे उद्या वितरण

Next
ठळक मुद्देगावांच्या कर्तृत्वाचा गौरव : दर्डा मातोश्री सभागृहात शानदार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिद्द, चिकाटी आणि मेहनतीतून गावाचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या जिल्ह्यातील सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड - २०१९’ने रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गौरविले जाणार आहे. येथील दर्डा मातोश्री सभागृहात हा देखणा सोहळा सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे. यासाठी नोंदणी सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत केली जाणार आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी अनिल आडे, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार मदन येरावार, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, आमदार ख्वाजा बेग, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार नामदेव ससाने प्रामुख्याने उपस्थित राहतील. याशिवाय जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचीही या सोहळ्याला उपस्थिती लाभणार आहे.
सरपंचांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. याकरिता ग्रामपंचायतींकडून त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मागविण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध गावच्या प्रवेशिका सरपंच अवॉर्डसाठी दाखल झाल्या होत्या. यातून परिक्षकांनी पुरस्कारासाठी गावांची निवड केली. या सर्व सरपंचांना या कार्यक्रमात गौरविले जाणार आहे. यवतमाळ येथे सलग दुसºया वर्षी हा सोहळा घेतला जात आहे. गावकºयांच्या साथीने सरपंच मंडळी गावाच्या विकासाकरिता जीवतोड मेहनत करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेतली जावी यासाठी सरपंच अवॉर्ड त्यांना प्रदान केला जाणार आहे.
या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची पावती या रूपाने त्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक बीकेटी टायर्स आहेत.

१३ श्रेणीत पुरस्कार
उदयोन्मुख नेतृत्त्व (नव्याने सरपंचपदी आलेले), पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, स्वच्छता, शैक्षणिक सुविधा, ग्रामरक्षण, ई-प्रशासन, आरोग्य, कृषी तंत्रज्ञ, पर्यावरण संवर्धन आदी १३ कॅटेगरीसाठी पुरस्कार दिला जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी लोकमत सरपंच अवॉर्डने गौरविले जाणार आहे.

Web Title: Distribution of 'Lokmat Sarpanch Award' tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sarpanchसरपंच