शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:00:29+5:30

निकृष्ट बियाण्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. कृषी केंद्र चालकांनी निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून शेतीची मशागत करून पेरणी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल व पोरके झाले आहे.

Crisis of double sowing on farmers | शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

googlenewsNext
ठळक मुद्देउगवलेच नाही : घाटंजीत निकृष्ट बियाण्यांचा कहर

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन व कपाशी पिकांची लागवड करण्यात आली. मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी अव्वाच्या सव्वा दरात नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले. मात्र पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.
भरपूर उत्पन होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र निकृष्ट बियाण्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. कृषी केंद्र चालकांनी निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून शेतीची मशागत करून पेरणी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल व पोरके झाले आहे.
मागीलवर्षीच्या शेतमालाचा मोबदलासुद्धा अनेकांना मिळाला नाही. कर्जमाफीही पदरी पडली नाही. त्यात कोरोनाचे संकट ओढवले. अशा चौफेर संकटांमुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यात आता पेरलेले उगवलेच नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आधीच बँकेत कर्ज मागायला चकरा माराव्या लागतात. कर्जमाफीचे घोडेसुद्धा अडकून आहे. आता सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. लोकप्रतिनिधीसुद्धा या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे मदत मागावी, असा प्रश्न आहे.

अंकुरलेल्या पिकांचे नुकसान
गेल्या आठवड्यात तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यात बेलोरा, करमना, दत्तापूर शिवारातील कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. करमना परिसरात गारपीट झाल्याने कपाशीच्या झाडांचे शेंडे तुटून पडले. पाने गळून गेली. काही ठिकाणी जमीन खरडून गेली. तरीही शेतात कुणी पंचनामा करून कृषी अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला नाही. या समस्येकडे सरकारने वेळीच आणि गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. बोगस बियाणे विक्री करणारे कृषी केंद्र व कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी आहे.

Web Title: Crisis of double sowing on farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.