CoronaVirus : केंद्रीय पथकाची यवतमाळातील प्रतिबंधित क्षेत्राला भेट, सुपर स्पेशालिटीमधील व्यवस्थेची पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 02:51 PM2021-03-01T14:51:26+5:302021-03-01T14:51:51+5:30

Central team visits restricted area in Yavatmal : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन तेथील कोरोना रुग्णासाठी असलेल्या सोई-सुविधांची पाहणी केली.

CoronaVirus: Central team visits restricted area in Yavatmal, inspects super specialty arrangements | CoronaVirus : केंद्रीय पथकाची यवतमाळातील प्रतिबंधित क्षेत्राला भेट, सुपर स्पेशालिटीमधील व्यवस्थेची पाहणी 

CoronaVirus : केंद्रीय पथकाची यवतमाळातील प्रतिबंधित क्षेत्राला भेट, सुपर स्पेशालिटीमधील व्यवस्थेची पाहणी 

Next

यवतमाळ : पश्चिम विदर्भातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाचे तीन सदस्यीय पथक सोमवारी अमरावती विभागात पोहोचले आहे. या पैकी एक सदस्य अमरावतीत, एक अकोल्यात तर एक सदस्य यवतमाळात दाखल झाले.  (Central team visits restricted area in Yavatmal, inspects super specialty arrangements)

डॉ. आशिष रंजन असे यवतमाळात दाखल झालेल्या केंद्रीय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांनी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन तेथील कोरोना रुग्णासाठी असलेल्या सोई-सुविधांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी यवतमाळ शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी, शिरे ले-आऊट येथील प्रतिबंधित क्षेत्राला प्रत्यक्ष भेट दिली. याशिवाय, अधिकाऱ्यांकडून कोरोनाची फेब्रुवारीतील रुग्णसंख्या, ती वाढण्यामागील कारणे, प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या, तेथील उपाययोजना व संभाव्य प्रतिबंधक उपायांबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी एम.डी. सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ,  अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरि पवार आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. आशिष रंजन यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या.
 

Web Title: CoronaVirus: Central team visits restricted area in Yavatmal, inspects super specialty arrangements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.