यवतमाळ शहरातील एटीएम बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:00:34+5:30

प्रत्यक्षात एटीएममध्ये नियमित कॅश डिलवर केली जात नाही. यामुळे अनेकांची गैरसोय होते. असे काही एटीएम शहरात आहे. तेथे कधीतरी कॅश भरण्यात येते. ज्या ठिकाणी पैसे असतात. त्या ठिकाणी साधा सुरक्षा गार्डही नसतो. लाखो रुपयांची रक्कम एटीएममध्ये असताना तेथे सुरक्षेकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसते. एटीएमवर कुठलाही गोंधळ झाल्यास त्या ठिकाणी अडचण दूर करणारा अधिकृत व्यक्ती नसतो.

ATMs in Yavatmal city unattended | यवतमाळ शहरातील एटीएम बेवारस

यवतमाळ शहरातील एटीएम बेवारस

Next
ठळक मुद्देचौकीदाराचा पत्ता नाही : चोरट्यांना खुले निमंत्रण, कोरोना संसर्ग नियंत्रणाच्या उपाययोजनाच नाही

जनसामान्याच्या सुविधेसाठी असलेले एटीएम सुरुवातीच्या काळात सुरक्षेसह सुसज्ज होते. आता मात्र तेथे पार्ट टाईम सुरक्षा व्यवस्था दिली आहे. काही एटीएमवर कुणीच फिरकत नाही. फक्त रोख टाकण्यापुरतीच एटीएमककडे चक्कर होते. त्यामुळेच शहरातील काही एटीएम फोडण्याचे प्रयत्न झाले. बेवारस एटीएम चोरट्यांना खुलेआम निमंत्रण देत आहे. नियमाप्रमाणे एटीएमवर सुरक्षा गार्ड २४ तास असणे अपेक्षित आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी रात्री केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये बेवारस एटीएमचे वास्तव पुढे आले.

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात विविध बँकांचे एटीएम आहेत. यामध्ये सर्वाधिक एटीएम स्टेट बँकेचे आहेत. व्यापारी बँकांचेही एटीएम आहेत. जिल्ह्यात २०२ एटीएम कार्यरत आहे. या एटीएममध्ये पाच ते १५ लाख रुपयांपर्यंतची रोख डिपॉझिट करण्याची क्षमता आहे. वर्दळीचे ठिकाण आणि त्या एटीएमचा वापर यावर या एटीएमची कॅश ट्रान्सफर अवलंबून असते.
पूर्वी एटीएममध्ये १०० च्या नोटा राहत होत्या. आता सर्रास ५०० व दोन हजारांच्या नोटा असतात. यामुळे कमी जागेत अधिक रक्कम ठेवता येते.
प्रत्यक्षात एटीएममध्ये नियमित कॅश डिलवर केली जात नाही. यामुळे अनेकांची गैरसोय होते. असे काही एटीएम शहरात आहे. तेथे कधीतरी कॅश भरण्यात येते. ज्या ठिकाणी पैसे असतात. त्या ठिकाणी साधा सुरक्षा गार्डही नसतो. लाखो रुपयांची रक्कम एटीएममध्ये असताना तेथे सुरक्षेकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसते. एटीएमवर कुठलाही गोंधळ झाल्यास त्या ठिकाणी अडचण दूर करणारा अधिकृत व्यक्ती नसतो.
एटीएमवर व्यवहार करताना ग्राहाकाला स्वत:च त्याची खबरदारी घ्यावी लागते. अनेक ठिकाणी एटीएम मशीनसह परिसर धुळीने माखलेला असतो. त्याची नियमित स्वच्छता होत नाही. आता पावसाळ्याच्या दिवसात अनेक एटीएममध्ये चिखल असल्याचे दिसते. भरलेले पाय घेऊन लोक आतमध्ये शिरतात. कोरोना काळात एटीएम वापरताना काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. प्रत्येकजण मशीन हाताळताना खबरदारी घेत नाही. यातून कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. मशीनमधून निघालेली स्लिप तशीच बेवारस फेकून दिली जाते. हा कचरा अनेक दिवस तसाच पडून असतो. यामुळे काही ठिकाणी एटीएम नव्हेत तर कचराकुंडी असे विदारक चित्र पहायला मिळते.
पोस्ट आॅफिस चौकात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या एटीएमवर सर्वाधिक वर्दळ असते. कर्मचारी, व्यापारी आणि इतर नागरिक या ठिकाणाहून पैस काढतात. या एटीएमचे प्रवेशद्वार तुटले आहेत. आतमध्ये प्रचंड कचरा आहे. याठिाकणची तीनपैकी केवळ एक मशीन सुरू असते. त्यामुळे येथे सतत रांग लागलेली असते. सुरक्षा गार्ड नसतो, बाहेर गेटवरच भीक्षूक बसलेले असतात. एटीएममधून बाहेर पडलेल्या व्यक्तींना ते पैसे मागतात. डाक विभागाचे एटीएम नव्याने सुरू होवूनही बरेचदा बंद असते. आता त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

पोलीस यंत्रणेवर ताण
बहुतांश बँकांकडून एटीएम सेवेसाठी ग्राहकांकडून शुल्क वसूल केले जाते. असे असले तरी, बँकांनी एटीएमची जबाबदारी आऊट सोर्सिंगवर सोपविली आहे. यात आर्थिक व्यवहारही होतात. मात्र सुरक्षिततेचा ताण पोलीस यंत्रणेलाच उचलावा लागत असल्याचे सांगितले जाते.

विड्रॉल मिळाला नसतानाही खात्यातून कपात
अनेकवेळा एटीएममध्ये पैसे अडकतात. अशा स्थितीत ग्राहकांच्या खात्यातून ही रक्कम वजा होते. ही रक्कम बँकेकडून परत मिळविण्यासाठी ग्राहकांना बँकेचा नंबर मिळत नाही. त्यासाठी प्रोसेस काय आहे याची माहिती नसते. अशा स्थितीत ग्राहक गोंधळून जातात.

एटीएम सांभाळण्याची जबाबदारी बँकांची आहे. त्यावर सुरक्षा गार्ड नेमणे आणि देखभाल करणे ही जबाबदारी बँकांची आहे. जिल्ह्यात सर्वाधिक एटीएम स्टेट बँकेचे आहे.
- सचिन नारायणे
अग्रणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक,यवतमाळ

एसबीआय टचला मार्गदर्शक हवा
तिरंगा चौकात एसबीआय टच ही नवीन संकल्पना मांडणारे अद्यावत एटीएम आहे. याठिकाणी ग्राहकांना पैसे भरता येतात, काढता येतात. पासबुकवर एन्ट्रीही करता येते. आधुनिक सुविधा या ठिकाणी आहे. मात्र त्याची माहिती अनेक ग्राहकांना नाही. व्यवहाराशिवाय ग्राहकांना परतावे लागते.

अ‍ॅक्सिस बँक एटीएमला सुरक्षा नाही
नगरपरिषदेच्या तळघरात अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी पूर्वी सुरक्षा गार्ड असायचे. आता ही यंत्रणा या ठिकाणी दिसत नाही. सोमवारी रात्री १०.३० वाजता हे एटीएम बेवारस होते. या ठिकाणी पैसे टाकण्याची आणि काढण्याची व्यवस्था आहे. येथे सॅनिटायझरचीही व्यवस्था नाही.

Web Title: ATMs in Yavatmal city unattended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम