लोकमत परिवारातील ज्येष्ठ पत्रकार अण्णाभाऊ कचाटे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 09:07 AM2021-05-11T09:07:42+5:302021-05-11T09:09:10+5:30

Yawatmal news लोकमतच्या प्रारंभापासून मारेगाव तालुका प्रतिनिधी पदाची धुरा समर्थपणे पेलणारे अण्णाभाऊ पंढरीनाथ कचाटे (७२) यांचे सोमवारी रात्री सावंगी मेघे (जि.वर्धा) येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुली, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Annabhau Kachate, a senior journalist of Lokmat Parivar, passed away | लोकमत परिवारातील ज्येष्ठ पत्रकार अण्णाभाऊ कचाटे यांचे निधन

लोकमत परिवारातील ज्येष्ठ पत्रकार अण्णाभाऊ कचाटे यांचे निधन

Next
ठळक मुद्देत्यांनी मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे तालुक्यातील पहिले वाचनालय सुरू केले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ: : लोकमतच्या प्रारंभापासून मारेगाव तालुका प्रतिनिधी पदाची धुरा समर्थपणे पेलणारे अण्णाभाऊ पंढरीनाथ कचाटे (७२) यांचे सोमवारी रात्री सावंगी मेघे (जि.वर्धा) येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुली, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर वणी, चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात सातत्याने उपचार सुरू होते. याच दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही पाॅझिटिव्ह आली. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने सावंगी मेघे येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

पेशाने शिक्षक म्हणून कुंभा येथील भारत विद्या मंदिरातून सेवानिवृत्त झालेल्या अण्णाभाऊंना समाजकार्याचीही आवड होती. वाचनाने माणूस समृद्ध होतो, ही त्यांची कायम भावना होती. ग्रामीण समस्यांचा त्यांना दांडगा अभ्यास होता. आदिवासीबहुल कोलाम समाजाच्या समस्या त्यांनी लोकमतच्या माध्यमातून शासन दरबारी मांडल्या. अध्यापनाच्या कार्यासोबतच लोकमत परिवाराशी ते अखेरच्या श्वासापर्यंत जुळून होते.

Web Title: Annabhau Kachate, a senior journalist of Lokmat Parivar, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू