Afraid of Withdrawn To the office bearers | मताधिक्यात माघारलेल्या पदाधिकाऱ्यांना धाकधूक
मताधिक्यात माघारलेल्या पदाधिकाऱ्यांना धाकधूक

ठळक मुद्देराळेगाव तालुका : राजकीय भविष्याची चिंता, पद जाण्याचीही भीती

के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : विधानसभा निवडणुकीत राळेगाव तालुक्यात भाजप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कामगिरी संमिश्र राहिली. याबाबतीत काही पदाधिकारी पास, काही नापास, तर काही चक्क वरपास झालेले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल आता आगामी महत्त्वपूर्ण निवडणुकीत श्रेष्ठींकडून निश्चित दखल घेतल्या जाणार आहे. कामगिरीनुसार तिकीट व पद देण्याचे धोरण राहणार असल्याने अनेकजण धास्तावले आहे.
भाजपचे राळेगाव विधानसभा प्रमुख म्हणून व वरध जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे पास झाले आहेत. त्यांच्या झाडगावातही मोठे मताधिक्य मिळाले आहे. उषाताई भोयर यांनी जळका जिल्हा परिषद गटातून, शीला सलाम यांनी जळका पंचायत समिती गण, प्रशांत तायडे यांनी झाडगाव पंचायत समिती गणातून आघाडी मिळवून दिली आहे. सहकार आघाडी अध्यक्ष आशीष इंगोले यांनी पिंपरी, दुर्गमधून मोठी आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे प्रीती संजय काकडे यांची वडकी जिल्हा परिषद गट, स्नेहा येनोरकर धानोरा पंचायत समिती गण यात भाजपला पिछाडी राहिल्याने त्यांचा मतदारांवरील प्रभाव घटल्याचे समोर आले आहे. राळेगाव तालुक्यात भाजपला केवळ एक हजार नऊ मतांची तेवढी आघाडी मिळाली आहे.
काँग्रेसमध्ये स्वत: उमेदवार असलेले प्रा. वसंत पुरके यांनी स्वत:च्या आठमुर्डी गावात चांगले मताधिक्य घेतले. सहकार नेते अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांच्या सावनेर, राळेगाव तालुका अध्यक्ष अरविंद फुटाणे यांच्या सावरखेड येथे काँग्रेसला मताधिक्य आहे. विदर्भ मार्केटिंग फेडरेशन नागपूरचे संचालक अरविंद वाढोणकर यांच्या वाढोणा बाजारामध्ये व पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे यांच्या वाढोणाबाजार गणात काँग्रेस माघारली आहे. पंचायत समिती उपसभापती नीलेश रोठे यांचे वरध गण, ज्योती खैरकार यांच्या वडकी गणात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. बाजार समिती उपसभापतींच्या वेडशी गावात, खविसं अध्यक्ष मिलिंद इंगोले यांच्या पिंपरी दुर्ग आणि रावेरी सरपंच राजेंद्र तेलंगे यांच्या गावात काँग्रेसला हे नेते मताधिक्य मिळवून देऊ शकले नाही. मात्र मताधिक्य देऊ न शकलेले कार्यकर्ते आणि विद्यमान पदाधिकाºयांमध्ये आता धाकधूक असल्याचे दिसून येत आहे.

नगरपंचायतमध्ये उमेदवारीला धोका
राळेगावमध्ये दोन्ही पक्षांचे सर्वच महत्त्वपूर्ण नेते, पदाधिकारी वास्तव्यास आहे. त्यांचे सतत येथे राजकारण सुरू असते. भाजप तालुका अध्यक्ष बाळासाहेब कवीश्वर, शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानंतर केवळ ५०४ मतांची आघाडी तेवढी भाजपला मिळाली आहे. राळेगाव शहरातील ११ मतदान केंद्रांपैकी नऊवर भाजपने आघाडी घेतली. काँग्रेसने केवळ दोनवर आघाडी मिळविली. यावरून काँगे्रसचे नगरसेवक, भाजपचे असंतुष्ट नगरसेवक व पदाधिकारी आपआपल्या प्रभागात, क्षेत्रात बेदखल ठरले असल्याचे स्पष्ट झाले. आगामी नगरपंचायत निवडणुकीत या सर्व अयशस्वी नगरसेवकांच्या तिकिटा धोक्यात आल्या आहेत.

Web Title: Afraid of Withdrawn To the office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.