यवतमाळ जिल्ह्यात सात मृत्युसह 327 जण पॉझिटिव्ह ; 337 कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 05:17 PM2021-04-06T17:17:37+5:302021-04-06T17:17:42+5:30

कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 337 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

327 positive with seven deaths in Yavatmal district; 337 coronal free | यवतमाळ जिल्ह्यात सात मृत्युसह 327 जण पॉझिटिव्ह ; 337 कोरोनामुक्त

यवतमाळ जिल्ह्यात सात मृत्युसह 327 जण पॉझिटिव्ह ; 337 कोरोनामुक्त

Next

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात सात मृत्युसह 327 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 337 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 62 व 72 वर्षीय पुरुष तसेच 58 वर्षीय महिला, महागाव 61 व 82 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, वणी येथील 78 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 327 जणांमध्ये 207 पुरुष आणि 120 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 106 पॉझेटिव्ह रुग्ण, उमरखेड 61, महागाव 29, पुसद 23, कळंब 14, नेर 14, झरीजामणी 14, घाटंजी 11, आर्णि 11, वणी 10, दारव्हा 9, दिग्रस 8, पांढरकवडा 5, बाभुळगाव 4 आणि इतर शहरातील 8 रुग्ण आहे.

मंगळवारी एकूण 3393 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 327 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3066 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3102 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1596 तर गृह विलगीकरणात 1506 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 31279 झाली आहे.

24 तासात 337 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 27476 आहे. तर जिल्ह्यात एकूण 701 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.71 असून मृत्युदर 2.24 आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 291981 नमुने पाठविले असून यापैकी 289095 प्राप्त तर 2886 अप्राप्त आहेत. तसेच 257816 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: 327 positive with seven deaths in Yavatmal district; 337 coronal free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.