यवतमाळ जिल्ह्यात ४८ तासात १७ मृत्यू ; ३५४ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 07:57 PM2020-09-18T19:57:38+5:302020-09-18T19:57:56+5:30

सद्यस्थितीत जिल्ह्यात यवतमाळ १२३४ अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ३८९ जण आहेत.

17 deaths in 48 hours in Yavatmal district; 354 newly positive | यवतमाळ जिल्ह्यात ४८ तासात १७ मृत्यू ; ३५४ नव्याने पॉझिटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात ४८ तासात १७ मृत्यू ; ३५४ नव्याने पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देदोन दिवसांत ५४८ जणांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ : वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ५४८ जण गत दोन दिवसांत बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात गुरुवारी ११४ जण तर शुक्रवारी ४३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच गत ४८ तासात जिल्ह्यात एकूण १७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून पहिल्या २४ तासात सात जण तर दुस-या २४ तासात १० जणांचा समावेश आहे. तसेच दोन्ही दिवसात जिल्ह्यात एकूण ३५४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात १२३४ अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ३८९ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७५४ झाली आहे. यापैकी ४९३९ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १८२ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ३०३ जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ६५६८५ नमुने पाठविले असून यापैकी ६४५६५ प्राप्त तर ११२० अप्राप्त आहेत. तसेच ५७८११ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: 17 deaths in 48 hours in Yavatmal district; 354 newly positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.