यवतमाळमध्ये 115 जण पॉझेटिव्ह, 65 कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 06:24 PM2021-02-14T18:24:45+5:302021-02-14T18:25:28+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 519 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 115 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 404 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

115 positive, 65 corona free in the district | यवतमाळमध्ये 115 जण पॉझेटिव्ह, 65 कोरोनामुक्त

यवतमाळमध्ये 115 जण पॉझेटिव्ह, 65 कोरोनामुक्त

Next

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात 115 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 65 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 519 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 115 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 404 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 601 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15238 झाली आहे. 24 तासात 65 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14199 आहे. तर जिल्ह्यात एकूण 438 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 148010 नमुने पाठविले असून यापैकी 147593 प्राप्त तर 417 अप्राप्त आहेत. तसेच 132355 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: 115 positive, 65 corona free in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.