Tap to Read ➤

चहल-धनश्रीचा काडीमोड; व्यभिचार, क्रूरतेसह या कारणांमुळे मिळतो घटस्फोट

क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने घटस्फोटाची प्रमुख कारणे कोणती? याची माहिती घेऊ.
व्यभिचार : दोघांपैकी एक जोडीदार स्वेच्छेने दुसऱ्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवत असेल, तर ते घटस्फोटाचे कारण असू शकते.
क्रूरता: जोडीदाराशी शारीरिक किंवा मानसिक क्रूरपणे वागत असेल, तर ते घटस्फोटाचे कारण असू शकते.
परित्याग : जर जोडीदार सोडून गेला असेल आणि परत येण्याचा कोणताही हेतू नसेल, तर ते घटस्फोटाचे कारण असू शकते.
धर्मांतरण : दोघांपैकी कोणीही दुसऱ्या धर्मात गेला असेल, तर ते घटस्फोटाचे कारण असू शकते.
मानसिक आजार : जर पार्टनर असाध्य मानसिक आजाराने ग्रस्त असेल, तर ते घटस्फोटाचे कारण असू शकते.
कुष्ठरोग : जर जोडीदाराला असाध्य कुष्ठरोग झाला असेल, तर ते घटस्फोटाचे कारण असू शकते.
लैंगिक रोग : जर जोडीदाराला असाध्य लैंगिक रोग झाला असेल, तर ते घटस्फोटाचे कारण असू शकते.
जर जोडीदार सात वर्षांपेक्षा जास्त काळ बेपत्ता असेल आणि तो मृत झाला आहे असे गृहित धरले जात असेल, तर ते घटस्फोटाचे कारण असू शकते.
डिस्क्लेमर : घटस्फोटाची कारणे प्रत्येक धर्मात वेगवेगळी असू शकतात. न्यायालय प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे विचार करते आणि त्या आधारावर निर्णय घेते. कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे.
क्लिक करा