Tap to Read ➤

लढवय्या युवी! एक नजर सिक्सर किंगनं सेट केलेल्या ५ जबरदस्त रेकॉर्ड्सवर

IPL मध्ये त्याने जी कामगिरी केली ती अजून कुणालाही नाही जमली
युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली एक विशेष छाप सोडली आहे. १२ डिसेंबर१९८१ मध्ये चंदीगढमध्ये जन्मलेल्या युवीनं २००० मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले होते.
टीम इंडियाकडून तो तब्बल १७ वर्षे क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसला. या काळात त्याने काही खास विक्रमाला गवसणी घातली. एक नजर त्याच्या नावे असलेल्या अविस्मरणीय अन् अविश्वसनीय रेकॉर्ड्सवर
आंतरारष्ट्रीय क्रिकेटशिवाय युवीनं आयपीएल स्पर्धेतही आपला जलवा दाखवून दिला आहे. एका हंगामात दोन हॅट्रिकची नोंद करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे. २००९ च्या हंगामात पंजाबच्या संघाकडून त्याने ही कामगिरी नोंदवली होती.
ICC च्या नॉक आउट लढतीत प्लेयर ऑफ द मॅचचा खास रेकॉर्डही त्याच्या नावे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी, वनडे वर्ल्ड कप आणि टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बाद फेरीत त्याने कमालीच्या कामगिरीचा नजराणा पेश करत सामनावीराचा मान मिळवला आहे.
मध्यफळीतील फलंदाजीत टीम इंडियाला त्याची रिप्लेसमेंट आजही मिळालेली नाही. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारताकडून सर्वाधिक ७ शतकांचा विक्रम त्याच्या नावे आहे.
एका ओव्हरमध्ये त्याने मारलेले सहा सिक्सर आजही चाहत्यांना आठवतात. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील टी-२० वर्ल़्ड कप स्पर्धेत त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ चेंडूवर ६ षटकार मारले होते.
युवराज सिंग हा भारताकडून सर्वात जलद अर्धशतक मारणारा खेळाडू आहे. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने १२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्याचा हा विक्रम बराच काळ अबाधित होता.
क्लिक करा