पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण सगळीकडे सारखं आहे, असं आपण समजतो. पण खरं म्हणजे, ते प्रत्येक ठिकाणी थोडंफार वेगळं असतं.
गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीवर घट्ट पकडून ठेवणार बल. पण या बलाचं प्रमाण पृथ्वीचा आकार, फिरणं आणि आतील रचना यावर ठरते.
ती oblate spheroid आहे. विषुववृत्ताजवळ फुगलेली आणि ध्रुवांवर चपटी. म्हणूनच ध्रुवांवर गुरुत्व जास्त, विषुववृत्तावर कमी.
जर तुम्ही ध्रुवावर गेलात, तर तुमचं वजन थोडं वाढेल. कारण तिथं तुम्ही पृथ्वीच्या केंद्राजवळ असता.
विषुववृत्तावर पृथ्वीचं फिरणं जास्त वेगानं होतं. त्यामुळं थोडं centrifugal force काम करतं आणि वजन कमी जाणवतं.
एका ७० किलो वजनाच्या माणसाचं वजन ध्रुवावर साधारण ७०.५ किलो तर विषुववृत्तावर ६९.५ किलो मोजलं जाऊ शकतं.
हिमालयासारख्या भव्य डोंगरांमुळे पृथ्वीचं वस्तुमान त्या भागात जास्त असतं. परिणामी गुरुत्व किंचित वाढतं.
समुद्राखालील खोल खड्डे, दगडांचे घनदाट थर, यामुळे गुरुत्व वेगळं होतं. काही ठिकाणी ते समुद्रपातळी मोजण्यावरही परिणाम करतं.
GRACE नावाच्या उपग्रह मोहिमेनं पृथ्वीचं गुरुत्व मॅप केलं. यातून ग्रीनलँडच्या बर्फ वितळण्यासारख्या बदलांचाही मागोवा लागतो.