Tap to Read ➤

पॅन कार्ड-आधार कार्ड हरवलं? परत कसं मिळवायचं?

अनावधानाने गोष्टी हरवतात आणि मग केवळ मनस्ताप करायची वेळ येते.
अनेकविध गोष्टींमध्ये आधार कार्ड अनिवार्य आहे. पण हरवल्यानंतर ते परत मिळवणे खूप कठीण होऊन बसते.
आधार कार्डसह पॅन कार्ड अतिशय महत्त्वाचे असते. अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी ही दोन कार्ड अत्यंत गरजेची असतात.
मात्र, अशातच आधार कार्ड आणि पॅन कार्ड चुकून, अनावधानाने हरवले तरी लोक टेन्शन मध्ये येतात.
पण आता अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण घरबसल्या तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड परत मिळवू शकता.
काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अधिकृत आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळू शकता. काय करावे लागेल?
सर्वप्रथम Uidai या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्हाला तुमचा आधार क्रमांक माहिती असेल तर तो तिथे द्यावा.
योग्य माहिती भरल्यानंतर Download Aadhaar च्या पर्यायावर जावे लागेल. यानंतर तुम्हाला आधार कार्ड मिळू शकेल.
मात्र, काहीच आठवत नसेल तर uidai च्या वेबसाइटवर 'ऑर्डर आधार रीप्रिंट' सेवेचा लाभ घेऊ शकता.
Uidaiनुसार OTP द्वारे हरवलेले आधार कार्ड मिळू शकते. आधार वेबसाइट किंवा mAadhaar App चा वापर करावा.
Uidai साइटवर Get Aadhaar सेक्शनमध्ये दिसत असलेल्या ऑर्डर आधार रीप्रिंट पर्यायावर क्लिक करा.
आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी यासारखी माहिती भरावी लागेल. त्यानंतर ओटीपी येईल. तो प्रविष्ट करा.
शुल्क भरल्यावर आधार कार्ड पुढील १५ दिवसात आपल्या पत्त्यावर येऊ शकेल. पॅन कार्डसाठीही अशीच प्रक्रिया करायची आहे.
UTIITSL वेबसाइटला भेट द्या. पॅन कार्ड सेवांच्या पर्यायावर जा. अधिकृत साइटवरून पॅन कार्ड सहजपणे काढू शकता.
अनेक लोक ही सेवा वापरत आहेत. ही सेवा वापरणे खूप सोपे आहे.
यात अनेक तपशील विचारले जातील. पॅन, जन्मतारीख, कॅप्चा इत्यादी भरावे लागतील. यानंतर तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकता.
क्लिक करा