Tap to Read ➤

टीम इंडियात 'यशस्वी' झेप; जैस्वाल कर्णधार रोहितसोबत इंग्लंडला रवाना

ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वाल WTC फायनलसाठी भारतीय संघासोबत रवाना झाला आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या या सामन्यासाठी यशस्वी राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असेल.
इंग्लंडला रवाना होतानाचे काही फोटो यशस्वीने शेअर केले आहेत.
७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जैस्वालने आयपीएल २०२३ मधील १४ डावात ६२५ धावा केल्या आहेत.
शानदार शतक ठोकून यशस्वीने सर्वांना प्रभावित केले.
भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळत आहे.
याआधी झालेल्या फायनलच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.
पण यावेळी दोन्हीही संघ आपल्या देशाबाहेर खेळत आहेत, त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहण्याजोगे असेल.
क्लिक करा