WC 2023 : २००० कोटींचं बजेट, १० सेकंदाच्या जाहिरातीसाठी ३ लाखाचा खर्च
क्रिकेट वर्ल्डकप २०२३ ला गुरुवारपासून सुरूवात झाली.
क्रिकेट वर्ल्डकप २०२३ ला गुरुवारपासून सुरूवात झाली. यावेळी संपूर्ण देशाची नजर टीम इंडियाच्या कामगिरीवर असणार आहे.
गुगलपासून ते कोकाकोला आणि निसान पासून ते सौदी अरामकोपर्यंत सर्वाच्या नजरा या वर्ल्डकपवर आहे. याचं कारण म्हणजे १४० कोटी ग्राहक.
दुग्धशर्करा योग म्हणजे क्रिकेट, दसरा, दिवाळी आणि भाऊबीजेसारखे सणही याच कालावधीत आहेत. त्यामुळे भारताबाबत सर्वच कंपन्यांमध्ये क्रेझ आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २००० कोटी केवळ जाहिरातींवर खर्च करण्याचा प्लॅन आहे.
गेल्या वर्ल्डकपच्या तुलनेत कंपन्या दहा सेकंदाच्या स्लॉटसाठी ४० टक्के अधिक म्हणजे ३ लाख रुपये खर्च करण्यास तयार आहेत. पाहूया कंपन्यांनी कशी केलीये तयारी.
वर्ल्डकपदरम्यान, जाहिरातींसाठी जागतिक कंपन्या लाखो डॉलर्स खर्च करत आहेत. यादरम्यान १४० कोटी जनतेला आकर्षित करण्याची संधी सोडण्याच्या विचारात कंपन्या नाहीत.
बँक ऑफ बडोदाचे चीफ इकॉनॉमिस्ट मदन सबनवीस यांच्या मते जगभरात वर्ल्डकप पाहिला जाणार आहे, परंतु जागतिक कंपन्यांसाठी भारत सर्वात मोठं गिफ्ट आहे.
डेलॉइट इंडियाचे पार्टनर जेहिल ठक्कर यांच्या अंदाजानुसार ब्रांड टुर्नामेंट दरम्यान अॅड स्लॉटवर जवळपास २ हजार कोटी म्हणजे २४० मिलियन डॉलर्स खर्च करू शकतात.
१० सेकंदाच्या जाहिरातींच्या स्लॉटची किंमत ३ लाख रुपयांपर्यंत आहे. २०१९ च्या वर्ल्डकपच्या तुलनेत हे दर ४० टक्क्यांनी अधिक आहे.