Tap to Read ➤

३५ कोटींच्या ‘या’ गायीचं काय आहे भारताशी कनेक्शन? जाणून घ्या

जगातील सर्वात महागडी गाय भारताची, ब्राझीलमध्ये झाला लिलाव
ब्राझीलची साडे चार वर्षाची गाय वियाटिना १९ FIV मारा इमोविसला जगातील सर्वात महागड्या गायीचा दर्जा मिळाला आहे.
अलीकडेच या गायीच्या मालकी हक्काचा एक तृतीयांश भाग लिलावात जवळपास ११ कोटी रुपयांना विकला.
आता या गायीची एकूण किंमक ४.३ मिलियन डॉलर म्हणजे तब्बल ३५ कोटी रुपये इतकी झाली आहे.
नेलोर जातीची ही गाय वियाटिना १९ एफआयवी मारा इमोविस गायीचा भारताशी खास संबंध आहे.
या गायीचे मूळ स्थान आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील आहे. त्यामुळे या गायीला नेलोर जातीची गाय म्हटलं जाते.
भारतातून या गायीच्या जाती ब्राझीलला पाठवण्यात आल्या. त्यानंतर तिथून त्या जगभरात पसरल्या.
उष्णतेच्या प्रदेशात त्या सहजपणे वास्तव्य करतात. या गायीची रोगप्रतिकारक शक्तीही जास्त असते.
नेलोर जातीच्या गायी पांढऱ्या रंगाच्या भरल्या अंगाच्या असतात. त्यामुळे त्या दिसायलाही सुंदर दिसतात.
क्लिक करा